नांदेड| नांदेड वाघाळा शहर महापालिका व इंदिरा गांधी हायस्कूल यांच्या वतीने हडको इंदिरा गांधी हायस्कूल मैदानावर दि. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शाळेच्या संघांनी सहभाग नोंदवला होता.
दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्याध्यापक व्ही.एन. देवसरकर, राष्ट्रीय पंच बालाजी ढगे , सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे, डॉ. रमेश नांदेडकर, आर.बी शिप्परकर, पी.डी. शिंदे, क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे, एम. एल. सुर्यवंशी, ए.पी. गरड, आर. एच. सज्जन, काशीम खान, ओंकार अंबुलगेकर, सचीन पाटील, व्ही.बी. पुयड आदी उपस्थित होते. यामधील विजेते खेळाडू यांना विभागीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.