नांदेड। पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नांदेड मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव अंतर्गत माझा गोठा स्वच्छ गोठा या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पशुपालकांमध्ये लंपी रोगाबाबत जनजागृती तसेच रोगाचा रोखणे हा आहे.
या मोहिमे अंतर्गत पशुवैद्यकीय पथके गावांना भेटी देऊन लंपी रोगाबाबत माहिती व सदर रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोठा स्वच्छतेचे महत्व इत्यादी बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून गोठा फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.पशुपालकांना कीटकनाशक औषधांचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
नांदेड तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने लिंबगाव, नरेश्वर, निळा, नेरली, विष्णुपुरी, वाघि या सर्व दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये दिनांक ६ डिसेंबर २०२२ राबविण्यात येणार आहे.आज नांदेड तालुक्यातील सायाळ गावांमधील सर्व गोठे उपसरपंच होनाजी जामगे, पोलीस पाटील शिवाजी घंटलवाड, यांच्यासह देवराव धुमाळ, शहाजी धुमाळ, संतोष जामगे, चांदु धुमाळ, परसराम जामगे,बालाजी जामगे,रवी जामगे,गजानन धुमाळ,संजय धुमाल व गावातील बहुसंख्य पशुपालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अविनाश बुन्नावार,लिबगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम गुट्टे ,नालेश्वर चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खरवडकर ,प्रदीप जोंधळे सूर्यवंशी व इतर कर्मचारी हजार होते.