नांदेड| गाडी क्रमांक 07651/07652 जालना -छपरा-जालना साप्ताहिक विशेष गाडी आणि गाडी क्रमांक 07413/07414 जालना-तिरुपती-जालना विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे :
1) गाडी क्रमांक 07413/07414 जालना-तिरुपती-जालना विशेष गाडी: गाडी क्रमांक 07414 जालना ते तिरुपती हि विशेष गाडी जालना रेल्वे स्थानकावरून दिनांक 11,18, 25 डिसेंबर, 2022 ला आणि दिनांक 01 जानेवारी, 2023 ला दर रविवारी जालना येथून सुटेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07413 तिरुपती ते जालना विशेष गाडी दिनांक 6, 13, 20 आणि 27 डिसेंबर, 2022 ला दर मंगळवारी तिरुपती येथून सुटेल.
2) गाडी क्रमांक 07651/07652 जालना-छपरा-जालना साप्ताहिक विशेष गाडी: गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा विशेष गाडी जालना येथून दिनांक 7, 14, 21, 28 डिसेंबर, 2022 ला दर बुधवारी सुटेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07652 छपरा ते जालना हि विशेष गाडी छपरा येथून दिनांक 9, 16, 23 आणि 30 डिसेंबर, 2022 ला दर शुक्रवारी सुटेल.