दरोड्याचा गुन्ह्यातील चार आरोपींना अटक, मुद्देमाल सह १४ मोबाईल १२ मोटार सायकल, हत्यार जप्त -NNL

 ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी


नविन नांदेड।
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील  दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून दरोड्यातील चार आरोपीतांकडून दरोडा व जबरी चोरी, मो.सा.चोरी मधील एकुण 14 मोबाईल व 12 मोटार सायकल, गुन्ह्यातील रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरले हत्यारांसह एकूण 7,लाख 23, हजार रूपयांचा मुद्देमाल केला जप्त केले असून या ऊलेखनिय कामागिरी बद्दल वरीष्ठ अधिकारी यानी अभिनंदन केले असून या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत दिनांक 17 नोव्हेंबर 22 रोजी कोहीनूर मिल जवळ तिघा जणांस अज्ञात आरोपीतांनी त्यांचकडील धारा हत्याराने दुखापत करून त्यांचेकडून जबरीने मोबाइल काढून घेऊन पळून गेले त्यानंतर दिनांक 18 नोव्हेंबर 22 रोजी रात्री  8.30 वाजता माता सुमारास भगवान बाबा चौक ते वाघाळा जाणारा रोडवर फिर्यादी नामे परवता गणपती सुरेवाड, रा. भगवानबाबा चौक नांदेड पा त्यांचे साथीदार मित्रांस दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच अनोळखी चोरट्यांनी त्यांचे जवळील धारधार शस्त्राने त्यांचेवर वार करून गंभीर दुखापत करून त्यांचेजवळील मोबाईल में नगदी 7000/- रूपये जबरीने काढून घेऊन पळून गेले. सदर घटनेवरून पो.स्टेनदि ग्रामीण येथे गुरनं 680-2022 कलम 395,397,427 भादवि सह कलम 4/25,4/27 माहका व गुरनं.695/2022 फलम 394,34 भादवि सह कलम 4/25/4/27 भाहका अन्वये गुन्हा दाखल आहे.

श्रीकृष्ण कोकाटे ,पोलीस अधिक्षक नदिड अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नदिय  सिद्धेश्वर मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हदीत मागील एका महीन्यात पडलेल्या दरोडा व जबरी चोरी सुनातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी दाखल गुन्ह्यामचील तपास जलद होण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे गुन्हे शोध पथक यांना गुन्हे उघड करण्याबाबत योग्य त्या सुचना देऊन केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक  आनंद बिचेवार, पोहेकॉ प्रमोद कन्हाळे, पोहेको प्रभाकर मलदोडे, पोहेका संतोष जाधव, पोहेकॉ  बालाजी लाडेकर, पोकों चंद्रकांत स्वामी, पोकों विश्वनाथ पवार यांनी गोपनिय माहीतगारामार्फत माहीती काढून गुन्हा करणान्या अज्ञात आरोपीतांची नावे निष्पन्न केली.

 त्यांचा शोध घेऊन आरोपी नामे सुबोध ऊर्फ बबल पि.सुनिल वडगावकर वय 21 वर्षे व्यवसाय बेकार रा. शनिमंदीराजवळ हडको, नांदेड वैभव राजू मुंडे वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. दत्त मंदीराजवळ सिडको नांदेड मानव बालाजी मुरकुटे वय 21 वर्षे व्यवसाय बेकार रा.मातोश्री नगर सिडको नांदेड रोहीत विजयकुमार कदम वय 20 वर्षे रा. दत्त मंदीराचे पाठीमागे विष्णुपुरी नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून पो स्टे नांदेड ग्रामीण हद्दीत केलेल्या गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करून सदर आरोपीतांकडून दरोडा व जबरी चोरी, मो.सा. चोरी मधील एकुण 12 मोटार सायकल ज्यामध्ये हिरो कंपनीची 06 स्पलेंडर 02 पेंशन 01,ग्लॅमर 01 ,होन्डा युनिकॉर्न, 01 होन्डा शाईन ,01 TVS असे मोटार सायकल व 14 अँड्रॉइड मोबाईल ज्यामध्ये OPPO कंपनीचे 04 मोबाइल, VIVO कंपनीचे 04 मोबाईल, MI Redmi कंपनीचे 03 मोबाईल, POCO कंपनीचा 01 मोबाईल SAMSUNG कंपनीचा 01 मोबाईल NARZO कंपनीचा 01 मोबाईल तसेच दरोड्याच्या व जबरी चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा करण्यासाठी वापरले हत्यार ज्यामध्ये 02 तलवार, 02 खंजर 01 कत्ती (कोयता) व गुन्ह्यातील नगदी 7000/- रूपये असा एकुण 7,23,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस कोठडी मध्ये असून चोरीस गेलेल्या आणखीन मोटार सायकल व मोबाईल जप्त होण्याची शक्यता आहे.

संबंधीत कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनात पो.स्टे.नांदेड ग्रामीण येथिल गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, पोहेकॉ, प्रमोद कन्हाळे, पोहेकॉ , प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ, संतोष जाधव, पोहेको बालाजी लाडेकर, पोकों चंद्रकांत स्वामी पोकों विश्वनाथ पवार पोना ज्ञानोबा कवटेकर, पोका शिवानंद कानगुले यांनी गुप्त बातमीदारामार्फतीने माहीती काढून व प्रत्येकाने वेगवेगळे कौशल्य वापरून सदर गुन्ह्यातील आरोपीतांची माहीती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

उल्लेखनिय कामगीरी बाबत निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड़, श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा यांनी विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी