नांदेड। अनिकेत नीळकंठ सरपाते याची नॅशनल टेनिस बॉल स्पर्धेत निवड झाल्या प्रसंगी नांदेडचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अनिकेतला क्रिकेट किट देऊन त्याचा सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जीवन जगणाऱ्या सदर खेळाडू 19 वर्षाचा असून तो लक्ष्मीनगर, खडकुत, नांदेड इथे राहतो. MP विश्वभारती पॉलिटे्निक कालेज येथे तो द्वितीय वर्षात शिकत आहे. अनिकेतच्या निवडी बाबत सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सत्कार केल्या नंतर माननीय खासदार महोदयांनी अनिकेतला यापुढे हि असेच खेळत राहा आणि नांदेड शहराचे नावलौकिक करा असे संबोधन केले.
याप्रसंगी महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, गंगाधर जोशी, विजय गंभीरे, दीपकसिंह रावत, सुशीलकुमार चव्हाण, आशिष नेरळकर, राज यादव आदींसह मान्यवर उपस्थित होते.