नवीन नांदेड। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड च्या वतीने अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली दि .२३ नोव्हेंबर रोजी बळीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सहकार महर्षी पदमश्री शामराव कदम होमियोपेथीक वैधकीय महाविद्यालय हडको येथे सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी विध्यार्थी यांना मार्गदर्शन केले,
बळीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सहकार महर्षी पदमश्री शामराव कदम होमियोपेथीक वैधकीय महाविद्यालय हडको येथे विध्यार्थी यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या शिबिरात विध्यार्थीनी नियमितपणे वाहन चालवताना घेण्यात येणारी खबरदारी व नियमांचे पालन करणे या विषयावर संदीप निमसे यांनी मार्गदर्शन केले ,यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्षा डॉ.सौ. शितलताई भालके,डॉ.पी.सी.ठाकूर सर ,डॉ.सौ.जे.ए.वानखेडे,डॉ.सौ.ए. जी.वानखेडे, डॉ.सौ.अर्चना वडजे डॉ.एस.एम.खांडरे ,डॉ. अब्दुल जकी ,डॉ.एस .बासू आणि इतर कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.