नविन नांदेड। राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान अंतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तुप्पा जवळील मठसंस्थान परिसरातील जवळील पाच एकर मैदानावर २५ हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिश्रम घेत आहेत,तर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने राहुल गांधी यांच्ये वारकरी वेषात फेटा, बांधुन विणा देऊन जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
भारत जोडो अभियान अंतर्गत १० नोव्हेंबर रोजी पदयात्रा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तुप्पा जवाहर नगर येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे , जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले यांच्या सह परिसरातील अनेक गावांतील संरपच पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत स्वागत करण्यात येणार आहे तर
सि गुप्र मधील सहभागी २५ हजार नागरीकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून ए.व बी गुप्रमधील पदाधिकारी व व्हि.आय.पी.साठी सिप्टा येथे करण्यात आली आहे.तर सकाळी ११ ते ३ जेवणानंतर राहुल गांधी यांच्या नवामोढा नांदेड येथील सभेसाठी उपस्थित असलेला जनसमुदाय रवाना होणार आहे.
पाच एकरांवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून साफ सफाई , टेन्ट,बनर यासह रंगरंगोटी व ईतर कामे सुरूवात केली आहे, तर कांकाडी, जवाहर नगर, तुप्पा, मुख्य मार्गावर दुतर्फा साफ सफाई करण्यात आली आहे, रस्ता दुतर्फा रोडवर मोठ मोठे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे.तर मंदिर परिसरात या ठिकाणी युवा नेते राहुल हंबर्ड, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले, राजु मोरे,बळीरामपुर संरपच अमोल गोडबोले भायेगाव ऊपसंरपच बालाजी पाटील कोल्हे, सुदिन बागल, शिवकांत कदम, चिमणाजी पाटील कदम, दता पाटील कदम, यांच्या सह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.