महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा विदर्भ दौरा यशस्वी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्य़ात महासभा कार्यकारिणीची निवड -NNL


उमरी/नांदेड।
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा स्थापन झाल्यानंतर महासभेने आता संपूर्ण विदर्भात लक्ष घातले आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची कार्यकारणी निवडण्यासाठी दोन दिवसाचा विदर्भ दौरा करून विदर्भातही आपले संघटन मजबूत केले आहे.

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार व राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत गुंडाळे यांनी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्याचा दौरा करून तेथे कार्यकारिणीची निवड केली आहे. 


महाराष्ट्रातिल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागात जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद विदर्भातही मिळाला आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यात महिलांची कार्यकारिणी ही निवडण्यात आली. येणाऱ्या काही दिवसात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भात संपूर्ण जिल्ह्यात महासभेची स्थापना करण्याचा विक्रम केला जाईल महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. महासभेच्या वतीने समाजातील गरीब बांधवांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.


काशी अन्नसञमच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते तर समाजातील गरीब कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर पिठाची गिरणी यंत्र व शेवया  मशीन मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात बीड जिल्ह्यापासून झाली असून महाराष्ट्रातील व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल. तसेच गतवर्षीपासून महाराष्ट्र राज्याचे  विद्यमान वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात महासभेच्या वतीने वृक्षारोपण करून तो दिवस वृक्ष दिवस साजरा करण्यात येत आहे. 

तसेच महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 13 नोव्हेंबर एकाच दिवशी एकाच वेळेला महा रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम यशस्वी होत आहे. समाज आत्मनिर्भर व्हावा, यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. समाजातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर नोकरी/रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन  करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या विदर्भ दौऱ्यात निवडण्यात आलेली जिल्हास्तरीय कार्यकारणी पुढील प्रमाणे...........

गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभा अध्यक्ष प्रा प्रशांत भाऊ तम्मेवार सचिव, श्री संजयभाऊ नारलावार कोषाध्यक्ष, श्री संतोषभाऊ संगनवार चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महासभा अध्यक्ष, डॉ अनिलभाऊ माडुरवार सचिव, श्री राजेश्वर (बंडूभाऊ) चिंतावार कोषाध्यक्ष, श्री  शंकरभाऊ गंगाशेट्टीवार यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अध्यक्ष, श्री संजयभाऊ पालतेवार सचिव, श्री राजेंद्रभाऊ भाऊ नालमवार, कोषाध्यक्ष..श्री विजय भाऊ पालतेवार, वर्धा जिल्हा महिला महासभा अध्यक्ष सौ समृद्धी कोकडवार,सचिव सौ प्रणिता बडेवार, कोषाध्यक्ष सौ कांचन नरहरशेट्टीवार यांची निवड झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी