महाकवि वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भिमशाहीरी जलसा उत्साहात पार पडला -NNL


लोहा|
लोहा येथुन जवळच असलेल्या मौ. कारेगाव येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन  सेनेचे मराठवाडा संघटक अनिलदादा गायकवाड यांनी महाकवि वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भीमशाहीर जलशाचे आयोजन केले होते. 

प्रथमसत्रातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट अभिनेता तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक बबनराव निर्मले, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते गंगाधर महाबळे, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, प्रसिद्ध उद्योगपती धनाजी दिघे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता दिघी, माजी सरपंच रावसाहेब किरवले, पोलीस पाटील शिवदास मुलूकपाडे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मोरे, माजी उपसरपंच बालासाहेब देशमुख, बि.एम. मोरे, दिगांबर किरवले, बालाजी दिघी, Dएँ कर्मचारी प्रदीप शेंबाळे , विठ्ठल गोडबोले, या मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महराज, महाकवि वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व दिप प्रज्वलीत करून उदघाटन करण्यात आले. 

आयु. सुमेध अनिलदादा गायकवाड यांच्या अठराव्या वाढदिवसा निमित्त केक कापुन मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तदनंतर दुसऱ्या सत्रातील महाकवि वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी मोहत्सवा निमित्त भिमशाहीर जलसा कार्यक्रमाचे  अध्यक्ष तथा  सांस्कृतीक अध्यक्ष विद्रोही प्रबोधनकार आंबेडकरी घराण्याचे कट्टर समर्थक कैलासदादा राऊत  व रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे यांच्या   शुभ हस्ते भिमशाहीर जलशाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थीती वंचितचे नेते के.एच. वन्ने, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेमीलाताई वाघमरे, दक्षीण जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप मगरे, अ‍ॅटो युनियन जिल्हाध्यक्ष विलास मगरे, जिल्ह उपाध्यक्ष अश्वीन गर्दनमारे, जिल्हामहासचिव राजेश घंटेवाड, आदीची उपस्थीती होती. 

या महाकवि वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्त संपन्न झालेल्या भिमशाहीरी जलसा मध्ये महराष्ट्रातील नामांकीत भिमशाहीर  कैलासदादा राऊत, बाबुराव गाडेकर,  गौतम पवार, बापुराव जमदाडे, भिमराव वाघमारे, आशोकराज भद्रे, संतोष मंत्री, गौतम पानपट्टे, जानी राजेश भारती, विकास राजा, राहुल भुजबळ, राजरत्न कांबळे, सुमेध एडके, मनिषा कांबळे, माया खिल्लारे, वंदना खिल्लारे, बुद्धीवंत आव्हाड, मिलिंद गायकवाड, माधव गायकवाड, आदी गायकांनी रात्रभर महाकवि वामनदादा कर्डक यांची गित गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करून रसिकांना सकाळपर्यंत खिळवुन ठेवले. या भिमशाहीर जलसचि स्वागताध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे तालूकाध्यक्ष सखाराम सोनवणे होते तर मुख्य आयोजक रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संघटक अनिलदादा गायकवाड हे होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी