नांदेड| केरळ राज्यातील सबरीमला उत्सव निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड येथून कोल्लम करिता दोन विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे, परतीच्या प्रवासात या गाड्या कोल्लम ते सिकंदराबाद अशा धावतील, ते पुढील प्रमाणे –
अनु क्र | गाडी क्र. | कुठून – कुठे |
प्रस्थान |
आगमन | दिनांक |
1 | 07129 | नांदेड – कोल्लम | 23.45 (गुरुवार) | 12.55 (शनिवार) | 17 आणि 24 नोव्हेंबर – 2022 |
07130 | कोल्लम – सिकंदराबाद | 15.00 (शनिवार) | 00.30 (सोमवार) | 19 आणि 26 नोव्हेंबर, 2022 |
या गाड्या निझामाबाद, सिकंदराबाद, विकाराबाद, रायचूर, गुत्ती, इरोड, एर्नाकुलम, कायनकुलम मार्गे कोल्लम अशा धावतील. या गाडीत 22 डब्बे असतील . वरील गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.