हिमायतनगर। आज १५ नोव्हेंबर "महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज साजरा करण्यात आला.
आज होत असणाऱ्या शिक्षकेत्तर दिनानिमित्त हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री रणखांब जी. एम. यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक श्री आर के जाधव, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री नंदकुमार मुधोळकर व विद्यालयातील कार्यरत वरिष्ठ लिपिक श्री इनामदार सर , प्रयोगशाळा सहाय्यक श्री सुवर्णकार एस. व्ही, ग्रंथपाल श्री राजू गाजेवार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अशोक महाजन, श्री लक्ष्मण गाडगेराव , श्री नजीर शेख, श्री आनंदा बरकमकर , प्रयोगशाळा परिचर श्री विजय अंभोरे या सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उप प्राचार्य प्राध्यापक डाके एल. टी , पर्यवेक्षक साखरे एम.जे. , ज्येष्ठ शिक्षक श्री मुनेश्वर सर, माजी मुख्याध्यापक श्री ठाकूर के.बी. श्री कराळे पि.टी. यांच्यासह सर्व प्राध्यापक सहशिक्षक हे उपस्थित होते.