मालपाणी विद्यालयाचा पॅटर्ण : शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीत -NNL

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न


नांदेड।
येथील मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात मंगळवारी जय वकील फौंडेशनच्या दिशा प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीत मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी थेट पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत याबाबत शाळा स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी सर्वच पालकांनी शाळेच्या संपूर्ण टीमची प्रशांशा करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख शाळेच्या प्रवेशानंतर आत्तापर्यंत उंचावत असल्याचे दिसून आले असे सांगितले.

शाळा ही केवळ विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास करून त्यांना भविष्यात नौकरी अथवा व्यावसायिक बनविण्याची फॅक्टरी नसून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कार्य करणारे ज्ञानमंदिर आहे. मुलामध्ये असणार्या नैसर्गिक उर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक व शाळेत समन्वय असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून दिशा प्रकल्पांतर्गत शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी प्रवेशावेळी विद्यार्थ्याचा बुध्यांक, आवड, त्याला येणाऱ्या समस्या जाणून घेवून वर्षभर या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा टास्क मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात येतो. 

शाळेस प्रारंभ होऊन ६ महिने पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीत विद्यार्थ्याच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालकात थेट संवाद साधण्यात आला. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यात होणाऱ्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गणेश धुळे, डॉ. मनीषा तिवारी, संजय रुमाले, मधुकर मनुरकर, मुरलीधर गोडबोले, आनंद शर्मा, सुप्रिया कराड, संगीता नरवाडे, आदींनी पालकाशी संवाद साधला व पालकांचे दिव्यांगांच्या  प्रश्नाबाबत समुपदेशन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण रामतिर्थे, अविनाश सुरणर, भीमराव दहीकांबळे, जिजाबाई खरटमोल आदींनी परिश्रम घेतले.

शिक्षक व पालकांच्या सांघिक प्रयत्नानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य – मुख्याध्यापक निर्मल 

मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी विद्यार्थाच्या विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ विद्यार्थ्याच्या विकासाची जवाबदारी शाळेची नसून पालक व शिक्षकाच्या समन्वयातून केलेल्या नियोजानानेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी