असा राजकीय स्वार्थ मी कधीच बघीतला हि नाही व बघणार ही नाही. आमदार केराम
किनवट, माधव सूर्यवंशी। आज दि.5 ऑक्टोबर रोजी सारखनी येथे अखिल भारतीय बेलदार समाजाचे कुलदैवत आदिशक्ती कान्हूसती माता देवस्थान येथे *कान्हूसती माता* भव्य यात्रा महोत्सव कार्यकामा प्रसंगी किनवट/माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम हे उपस्थित होते कार्यक्रमा प्रसंगी आमदार केराम म्हणाले सत्ता असेल वा नसेल, बहुसंख्य माझा समाज जरी असला तरी इतर समाजबांधवांनी मला नेहमी बंधुभावाची वागणुक दिली आहे.विधानसभेतील सर्व समाज बांधवान सोबत माझा सरळ ऋणानुबंध आहे माझ्या घराचे दरवाजे नेहमी सगळ्यांसाठी खुले असतात. समाज किती मोठा आहे व मला ह्या समाजाचा राजकीय फायदा किती होईल?असा राजकीय स्वार्थ मी कधीच बघीतला हि नाही व बघणार ही नाही . कान्हूसती मातेवर बेलदार (ओड) समाजाची असलेली निष्ठा, प्रेम व श्रद्धा पाहून खरोखरच मन हेलाऊन गेले आहे. समाज कोणताही असो माझी नैतिक जबाबदारी समजून कान्हूसती माता मंदीर व परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी सारखणीतील कान्हूसतीमाता यात्रा उत्सव सोहळा सांगता प्रसंगी असंख्य समाजबांधवांच्या साक्षीने केले.
४ नोव्हेंबर पासून यात्रेची सुरुवात होऊन ५ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. त्यावेळी प्रमूख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम यानी उपस्थित समाजाला भरीव आश्वासन दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, भाजपा नेते अनिल तिरमनवार, धरमसींग राठोड, दत्ता आडे, गजानन कोल्हे, विशाल जाधव, ठाकूर जाधव, पं.स. सदस्य निळकंठ कातले, सपोनि तिडके, लक्ष्मण मिसेवार, सपोनि.भोपळे ,संतोष मरस्कोल्हे ,याच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दत्तराव मोहिते, अनिल मोहिते, रवि चव्हाण, विष्णू साळूंके, अर्जून जाधव, संजय चव्हाण, अंबादास चव्हाण, संतोष जाधव, बालाजी चव्हाण, सुदर्शन जाधव, किरण जाधव, पप्पू जाधव, दिनेश जाधवांसह अन्य समाज प्रमुखांच्या अथक परिश्रमामुळे अनेक वर्षापासूनची यात्रा परंपरा चालू असल्याचे कान्हुसतीमाता संस्थांनचे रवी चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमाला बेलदार (ओड) समाजातील नागरिक, महिला, युवकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.