लोहा| व्हिजन स्प्रिंग इंडिया फाउंडेशन पुणे व भाई डॉ केशवराव धोंडगे शतकोत्सवी वर्षा निमित्ताने लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयात साडे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करण्यात आली त्यानंतर ज्यांत नेत्र दोष आहे. त्यांना मोफत चष्मा देण्यात येणार आहे. असे फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
व्हिजन स्प्रिंग इंडिया फाउंडेशन पुणे ही संस्था "चांगले पहा-चांगले करा" हे घोष वाक्य घेऊन संपूर्ण देशात ही डोळ्यांसाठी काम करते .या फाउंडेशन च्या वतीने शेकाप चे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या शकोत्सवी वर्षा निमित्ताने शहरातील शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येत आहे
शिवछत्रपती विद्यालय लोहा येथे प्राथमिक-माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी शिबीर ठेवण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे व प्राथमिक मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी शाळेतील साडे चारशे विद्यार्थी तसेच कर्मचारी यांची नेत्र तपासणी करून घेतली व ज्याचे नेत्र दोष निघालेत त्यांना चष्मा मोफत देण्यात येणार आहे.
व्हिजन स्प्रिंगचे संस्थापक जॉर्डन कॅसोलो यांच्या प्रेरणेतून नंतर मोफत नेत्र तपासणी व चष्मा देण्यात येतो. शिवछत्रपती विद्यालयात टीम प्रमुख दर्शना नौकरकर यांच्या नेतृत्वाखाली नेत्र तज्ज्ञ डॉ शीतल शिरसाठ, नेत्र तज्ञ डॉ सोनल लांडगे, प्रतीक्षा पाटील ( मोबिलायझर) व समन्वयक अजिंक्य पतंगे यांनी विद्यार्थी तपासणी केली संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांनी तपासणी शिबिराची पाहणी केली .संस्था व शाळेच्या वतीने फाउंडेशन टीमचा सत्कार करण्यात आला.संत गाडगे महाराज विद्यालयातील हरी पाटील शिंदे, पर्यवेक्षक आर आर पाटील पांगरिकर यांनी टीमशी संवाद साधला .शिवाजी संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांच्या संकल्पनेतून त्याच्या संस्थेत विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली .