किनवट, माधव सूर्यवंशी। मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी मशाल चिन्हावर दणदणीत विजय प्राप्त केला. या विजयाचे वृत्त कळताच किनवट येथे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे यांच्या नेतृत्वाखाली येथील जिजामाता चौकात फटाक्यांची जोरदार आतिश बाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर व चिन्ह निश्चित झाल्यानंतर मुंबई येथील अंधेरी विधानसभेची पोट निवडणूक झाली या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून होते. अतिशय प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा दणदणीत विजय झाला. यावेळी शिवसैनिक व युवा सैनिकांनी येथील जिजामाता चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला मशाल या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने पहिला विजय प्राप्त केला आहे.
विजयाची ही घोडदोड यापुढेही अशीच कायम राहील असा विश्वास युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा व फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू सातुरवार बाबुभाई जाटवे अनिल राठोड मारुती मिरे आकाश पवार सय्यद इसरत लहू मेटकर शेख परवेज यांच्यासह युवा सैनिक व शिवसैनिक ऊपस्तित होते.