गणराया अवार्डचे थाटात प्रकाशन
अर्धापूर,निळकंठ मदने| पोलिस अधीकाऱ्यांच्या निरोप समारंभाला त्यांच्या कामाची पावती म्हणून मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहुन, मोठ्या प्रमाणावर पुष्पहारांनी पोलिस अधीकाऱ्यांचे स्वागत केले, त्यामुळे अर्धापूर तालुकावासीयांना कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक भोकर विजय कबाडे यांनी गणराया अवार्ड वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
शहरी व ग्रामीण गणेश मंडळाला गणराया बक्षीस वितरण,पोलिस अधिकारी विजय कबाडे,आर्चना पाटील यांना निरोप व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धरणे व डीवायएसपी भोरे यांचे स्वागत,या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी अ पो अ डॉ खंडेराव धरणे हे होते तर प्रमुख पाहुणे अ पो अ विजय कबाडे, उविअ अर्चना पाटील, डॉ सीध्देश्वर भोरे,नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,मुख्याधीकारी शैलेष फडसे,पो नि महेश शर्मा मुदखेड, धर्मराज देशमुख, संजय देशमुख लहानकर, अँड किशोर देशमुख, बालाजी पाटील गव्हाणे,दता पाटील पांगरीकर,राजेश्वर शेटे, संतोष गव्हाणे,बाबूराव लंगडे, अशोक डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संयोजक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी पाहुण्यांचा स्मृती चिन्ह, शाल, हार, प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
ग्रामीणचे शिवस्वराज्य गणेश मंडळ मालेगाव (प्रथम) अध्यक्ष राजू इंगोले, नवयुवक गणेश मंडळ पिंपळगाव (म)(द्वितीय) अध्यक्ष त्र्यंबक देशमुख, जय शिवराय गणेश मंडळ बेलसर(तृतीय) अध्यक्ष आनंदा क्षीरसागर,तर शहरातील वृंदावन काॅलनी गणेश मंडळ बायपास(प्रथम) अध्यक्ष विलास कापसे,आनंद नगर गणेश मंडळ अर्धांपूर (द्वितीय) अध्यक्ष दता जडे,बालाजी सार्वजनिक गणेश मंडळ (तृतीय) अंबादास आंबेगावकर, प्रोत्साहनपर बक्षीस आदर्श गणेश मंडळ माळी गल्ली व उल्लास कल्याणकर पोलिस पाटील पिंपळगाव (म) यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशीस्तीपत्र,शाल,हार देऊन बक्षीस प्रदान करण्यात आले.यावेळी वर्धाला बदली झालेले विजय कबाडे म्हणाले कि, नगरपंचायत निवडणुक असो की गणेश महोत्सव,ग्रामीण भागातील २ गावातील तत्कालीन तणाव याप्रसंगी लोकप्रतिनिधी नेहमी पोलीसांच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही.
त्यामुळे पोलीसांना मुक्त पणे काम करु दिल्याने अनेक घटना टळल्या,याकामी प्रतिष्ठीत नागरीक व पत्रकारांनी नेहमी सहकार्य केल्याने शांतता कायम आहे,त्यांनी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले.अर्चना पाटील म्हणाल्या कि,मी शिक्षक असल्याचा फायदा पोलीसींग करतांना होत असून, शांतपणे काम करण्याचे तंत्र त्यामुळे अवगत झाले असून, तालुक्यातील नागरीकांच्या सहकार्यामुळेच दोन्ही वेळा यशस्वी काम करता आले,हे पोलीसांचे सांघीक यश असल्याचे सांगितले,प्रस्ताविकात पो नि अशोक जाधव यांनी गणराया अवार्ड चा दिलेला शब्द पोलिस पुर्ण करीत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच शांत ठाणे म्हणून अर्धापूर ठाण्याची गणना होत आहे,हा कार्यक्रम अधीकाऱ्यांचा निरोप, स्वागत व गणरायाचे बक्षीस वितरण हे त्रीवेणी संगम असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ धरणे म्हणाले कि, ज्या ठाण्यात अधीकारी चांगला तिथे शांतता रहाते, पोलिस, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार यांचे येथे उत्तम नाते असल्याचे दिसत असून, यामुळे अधीकाऱ्यांना सर्वश्रेष्ठ काम करण्यासाठी प्रेरणा मिळते असे म्हणत अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले.यावेळी कृष्णा देशमुख,मुसव्वीर खतीब,भगवान कदम,अड किशोर देशमुख, संतोष गव्हाणे, संजय देशमुख लहानकर, छत्रपती कानोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी अध्यक्ष निळकंठराव मदने व आभार प्रदर्शन सपोनि साईनाथ सुरवसे यांनी मानले.यावेळी नासेरखान पठाण, प्रवीण देशमुख,गाजी काजी,राजू बारसे,सलीम कुरेशी,सोनाजी सरोदे,आर आर देशमुख,पंडीत लंगडे, व्यंकटी राऊत,व्यंकटराव साखरे,डॉ विशाल लंगडे, डॉ हाक्के, ओमप्रकाश पत्रे,सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर,नागोराव भांगे,फिरदोस हुसैनी, रामराव भालेराव, गोविंद टेकाळे,अमोल इंगळे, संदीप राऊत,शंकर कंगारे,उदयकुमार गुंजकर, सदाशिव इंगळे,सदाशिवराव देशमुख, विशाल बारसे, फौजदार बळीराम राठोड,कपील आगलावे,भिमराव राठोड, महेंद्र डांगे, राजेश घुन्नर,राजेश वर्णे,सदाशिव देशमुख, मारोतराव देशमुख,रमाकांत हिवराळे,रुपेश देशमुख, शंकर टेकाळे, संजय,रोडा,शेग नवीद, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.