महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन ; हजारो शिवसैनिकांचा रॅलीत सहभाग.
नांदेड| जिल्ह्यातील नव्या राजकारणातील आश्वासक चेहरा तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवनियुक्त जिल्हाप्रमुख माधव पावडे आणि बबन बारसे यांचे आज नियुक्ती नंतर नांदेड शहरात प्रथम आगमनानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले.दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या प्रथम आगमनानिमित्त शहरात भव्य रॅली काढून महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.या रॅलीत हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात कलाटणी देणारे नेतृत्व म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्याकडे पाहिले जाते.युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान, शिवसेनेच्या बांधणीसाठी केलेले कार्य आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील हिंदुत्व घराघरात पोहोचण्यासाठी केलेल्या कामापाठोपाठ पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी केली. या कामाची पावती म्हणूनच त्यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे,युवा सेना सचिव वरूण सरदेसाई,संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली माधवराव पावडे यांनी आपली राजकीय जडणघडण केली आहे.
लव्ह जिहादच्या विरोधात त्यांनी केलेली असंख्य आंदोलने नांदेडकरांच्या चांगलीच स्मरणात आहेत. हिंदुत्वासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवणाऱ्या माधव पावडे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणूनही यापूर्वी चांगलीच कारकीर्द गाजवली.शेतकरी,कामगार व बेरोजगारांच्या समस्या घेऊन सातत्याने लढा देणाऱ्या माधवराव पावडे यांची नांदेड जिल्हाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्यानंत आज दि.२८ रोजी ते पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले. सकाळी साडेआठ वाजता देवगिरी एक्सप्रेसने ते नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचताच हजारो शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. नवनियुक्त जिल्हाप्रमुख बबन बारसे यांचेही यावेळी शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले.
त्यानंतर दोन्ही नवनियुक्त जिल्हाप्रमुखांची उघड्या जीप वरून मिरवणूक करण्यात आली. ही मिरवणूक काढताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,आधुनिक भारताचे निर्माते महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मिरवणूक रॅली करण्यात आली. या रॅलीत हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.
जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देणार - जिल्हाप्रमुख माधव पावडे
शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देतांनाच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील हिंदुत्व,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ध्येय धोरणे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू सोबतच,शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकवू असा विश्वास नूतन जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी या निमित्ताने व्यक्त केला.