हुजपामध्ये एक दिवसीय योग शिबिर संपन्न -NNL


हिमायतनगर।
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड येथील पतंजली योग परिवार  जिल्हा परिषद नांदेड, व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय राजीव भाई दीक्षित यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त तसेच भारत स्वामीभान वर्धापन दिन आणि आजादी का अमृत महोत्सव तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त 16 नोव्हेंबर 2022 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत निशुल्क नांदेड जिल्ह्यातील एक हजार एक शाळेत योग शिबिराच्या आयोजना मानस आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून हिमायतनगर येथील हुजपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समान संधी अंतर्गत एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जवळपास 420 इतके विद्यार्थी व विद्यार्थिनी, 52 शिक्षक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या योग शिबिरात योग गुरू म्हणून उपस्थित असलेले श्री अनिल अमृतवार (सहप्रभारी, भारत स्वाभिमान, महाराष्ट्र राज्य पूर्व) व श्री शिवाजीराव शिंदे हळदेकर (सहप्रभारी, भारत स्वाभिमान, नांदेड जिल्हा) तसेच हिमायतनगर येथील उद्योजक श्री गौतम विठ्ठलराव हनवते आदी नी योगाभ्याचे मौलिक मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांकडून योग्य रितीने योगाभ्यास करून घेतला व त्यात योगासनाचे, आरोग्याचे व आहाराचे महत्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम रीतीने व सोप्या भाषेतून पटवून दिले.

सदरील योग शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  उज्ज्वला सदावर्ते मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एल. टी. डाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे आणि NSS स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले. तसेच या योग शिबिराला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी