मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाबुराव कदम कोहळीकर यांची मागणी
मुंबई/नांदेड| इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याच्या बेलमंडळ गावाजवळून शाखा कालवा किंवा वितरीका काढल्यास तालुक्यातील 13 गावातील जमीनी सिंचनाखाली आणण्यासाठी मदत होईल. यासाठी कालव्यास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोलचे खा.हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.
विदर्भ मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेच्या वरील भागात इसापूर धरण आहे. या इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याच्या बेलमंडळ गावाजवळून शाखा कालवा किंवा वितरीका काढण्यात यावा. यामुळे हदगांव तालुक्यातील भाटेगाव, उमरी, निवळा, कोळी, चक्री, महाताळा, तळणी, कोहळी, निवघा, वरुळा, शिरड अशा 10 ते 12 गावातील शेतीला सिंचनाचा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.
ह्या गावातील शेतकऱ्यांची मागणी गेल्या 18 वर्षापासून प्रलंबीत असुन, आज रोजी पर्यंत कोणीही संबंधीत गावच्या शेतकऱ्यांना न्याय देवू शकले नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून संबन्ध महाराष्ट्रातील जनता म्हणून आपल्याकडे शेतकरी नेता म्हणून पहात आहे. त्यामुळे हदगाव तालुक्यातील हि मागणी मार्गी लावून शेतकऱ्याना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवेदन देऊन केली आहे.