अर्धापूर,निळकंठ मदने| वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जगेल तर देशासाठी ही शपथ घेऊन क्रांतीकारकांना सैनिकी शिक्षण देण्यात उस्ताद असलेले क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पराक्रमी इतिहास होता, विपरीत परिस्थितीत त्यांचे कार्य प्रेरणादायी होते, युवकांनी त्याच प्रेरणेणे जीवनात यशस्वी होण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन पो नि अशोक जाधव यांनी केले.
अर्धापुर तालुक्यातील पार्डी (म) येथे दि .१४ नोव्हेंबर रोजी क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे निळकंठराव मदने होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक अशोक जाधव, कृऊबाचे संचालक निलेश देशमुख,संपादक रमेश भालेराव,सरपंच जिजाबाई कांबळे, जीतेन्द्र देशमुख,रुपेश देशमुख,श्यामराव देबगुंडे,शेकुराव हापगुंडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी निलेश देशमुख म्हणाले कि,जयंतीच्या कार्यक्रमात डि जे लावण्यापेक्षा महापुरुषांचे विचार अंगीकृत करावे,तर रमेश भालेराव यांनी दोन वर्षात क्रांतिवीर लहुजी साळवे गुरुग्रंथ लिहीला असून, लवकरच या ग्रंथाचे छपाई करून प्रकाशन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषनात निळकंठराव मदने म्हणाले कि, महापुरुषांना एक समुदयात लादू नये, त्यांनी सर्वांसाठी काम केले आहे, वस्ताद लहुजी साळवे यांचा पराक्रमी खरा इतिहास जगासमोर आणण्याची गरज असल्याचे सांगितले. रुपेश देशमुख,बाळू कांबळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब कांबळे, प्रस्तावित इंजी.चंद्रकांत पार्डीकर तर आभार बिबिशन कांबळे यांनी मानले.
यावेळी युनूस नदाफ,आकाश देशमुख ,प्रसाद हापगुंडे,शेखलाल ,कानबा पवार,नागनाथ कापसे ,केवळजी ठोबरे, बालाजी पाटोळे,हरीभाऊ उचलखांबे,रामा कांबळे,कानबा पवार,प्रल्हाद शिंदे,पंकज खुणे ,गजानन कांबळे,वैजनाथ गजभारे ,कृष्ण गजभारे ,चंद्रकांत कांबळे ,मारोती गरडे ,राजेश गायकवाड ,पांडुरंग काळे,आकाश सुर्यवंशी,बाळू कदम,नितीन कांबळे ,श्याम कांबळे,राम (बंटी) पवार आदी उपस्थित होते .