नांदेड| होलीसिटी पब्लीक स्कुलच्या मीमांसा पाडमुखने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश मिळवले असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नांदेड शहरालगत असलेल्या पासदगांव येथील होलीसिटी पब्लीक स्कूलमध्ये कु.मीमांसा रूपेश पाडमुख ही इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेत आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थींसाठीची शिष्यवृत्तीची परिक्षा कोरोनामुळे यावर्षी घेण्यात आली. या परिक्षेचा नुकताच निकाल लागला असून यात कु.मीमांसा पाडमुखने चांगले गुण प्राप्त केले आहे.
या अगोदरही तिने वेगवेगळ्या परिक्षेत यश मिळवले आहे. अभ्यासासह चित्रकलेत निपूण असणार्या कु.मीमांसाच्या यशाबद्दल होलीसिटीचे प्रिन्सीपॉल मो.अर्शद सर, उपप्राचार्य सुजाता नाईक, सुभाष शिंदे, संदीप गवते, वैभवी कुलकर्णी, बाळासाहेब पवार यांच्यासह सर्व स्टाफ व आप्तस्वकीयांनी अभिनंदन केले आहे.