अवैध दारू विक्रीवर अधीक्षक कानडे यांची "अतुल"नीय कामगिरी
लोहा/नांदेड| जागोजागी दारू सहज मिळत असते गावोगावी अवैध दारू विकणारे मोठ्या प्रमाणात असतात अर्थात त्याचा त्या गावाला मोठा त्रास सहन करावा लागतो पण पोलिसांना हप्ता देऊन हे अवैध दारू विक्री केली जाते.लोहा शहरात परमिट रूम, देशी दारू दुकान, बिअर बार , बिअर शॉपी या अधिकृत असतानाही ढाबा..मटण हॉटेल तसेच काही ठिकणी उघडपणे अवैध दारू विकली जाते पण राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांनी मात्र अवैध दारू विकणाऱ्या व पिणाऱ्यावर मात्र कायद्याचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मद्यापीनो खबरदार ..धाब्यावर.. मटण हॉटेलवर दारू प्याल तर तीन ते पाच वर्षांचा करावासा किंवा २५ते ५०हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. विद्यालया पेक्षा मद्यालय अधिक असलेल्या लोह्यात अवैध दारू विक्री व सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एखादा सक्षम व प्रभावी अधिकारी असेल आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करणारे असतील तर अधिपत्याखाली कर्मचारी अधिकारी सुध्दा सरळ होतात. आणि लोकांनाही कायद्याचा नियमांचे पालन कारणे भाग पडते.नांदेड जिल्ह्यात विशेषतः लोहा शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री जणू काही वैध झाली आहे अशी स्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी लोहा शहर व तालुक्यातून दरमहा मोठ्या प्रमाणात वाइन मार्ट बार-देशी-बिअर शॉपी, धाबेवाले अनाधिकृत पण त्याच्या आशिर्वादाने दारू विक्री करणाऱ्या कडून हप्ता घेऊ जातात.
राज्यात विषारी गावठी दारूने बळी गेल्याच्या घटना अधून मधून होतात त्याच शिवाय दारू बंदी सप्ताह व बंद बारी असली तरी बार -वाइन मार्ट , देशी दारू दुकानातून हमखास दारू विक्री होते.पण दारू बंदी अधिकारी कर्मचारी यांनी मोठी कार्यवाही केली असे कधी घडत नाही. पण मागील काही दिवसा पासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री व सेवन करणाऱ्यांवर नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाहीची बडगा उगारला आहे. दारू देणाऱ्या व पिणाऱ्या असा सर्वांवर कार्यवाही केली जात आहे. त्याचा परिणाम धाब्यावर मटण हॉटेलवर दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत .जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कानडे यांची "अतुल "नीय कार्यवाही मद्यापीना धडकी भरविणारी ठरली आहे.
● काय सांगतों कायदा ●
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल / धाबा / क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी मध्ये शासन मान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षा पर्यंत कारावासाची शिक्षा, किंवा रु.२५०००/- ते ५०,०००/- पर्यंत दंड, किंवा दोन्ही होवू शकते. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ अन्वये एखादी ग्राहक / व्यक्तीने अवैध हॉटेल / धाबा / क्लब इत्यादी ठिकाणी मद्य प्राशन केल्यास त्यांना रु ५,०००/- पर्यंत दंड होवू शकतो. म्हणून “नागरीकांना अहवान करण्यात येते की, कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकसह मदयसेवन करणा-या इसमा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे लोहा शहर व आजूबाजूच्या ढाबा मटण हॉटेल मधून अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी धसका घेतला आहे.