विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पेट-२०२२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आर.ए.सी. बैठक -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पेट-२०२२ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी आर.ए.सी.(रिसर्च अलोकेशन कमिटी) बैठक विषयानुरूप२१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पेट-२०२२ परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले आणि ज्यांना या परीक्षेमधून सुट मिळालेली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी अधिष्ठाता कक्षामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

पेट-२०२२ च्या माहिती पुस्तिकेत नमूद केल्यानुसार रिक्त जागांची पेट पास उमेदवारांसाठी ६० टक्के तर पेट परीक्षेतून सूट उमेदवारांसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आलेली आहे.पेट परीक्षेतून सूट मिळालेल्या उमेदवारांसाठी असलेल्या रिक्त जागांमध्ये नेट, सेट, जे.आर.एफ., गेट, जी-पॅट साठी ३०टक्के जागा आरक्षित आहेत. त्यामध्येचएम.फिल साठी २०टक्के, अनुभवी शिक्षकांसाठी २० टक्के,इंस्पयार फेलो १० टक्के,संशोधन पदव्युत्तर पदवीधरक ५ टक्के,  राष्ट्रीय प्रयोगशाळा अनुभव ५ टक्के, व्यावसायिक, औद्योगिक ५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ५ टक्के याप्रमाणे आरक्षण असणार आहे. 

आर.ए.सी.समोर उपस्थित राहणाऱ्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित छायाप्रतीचा एक संच, पेट-२०२२ परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अथवा पेट परीक्षेतून सूट मिळाल्याचे वैधता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, नेट, सेट प्रमाणपत्र, लागू असल्यास एम.फिल प्रमाणपत्र इत्यादी सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सदर आर.ए.सी. ला सामोरे जाणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य हाती घेण्याची क्षमता सिद्ध करणे आवश्यक आहे. 

संबंधित विषयात पेट-२०२२ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आर.ए.सी. बैठकीस स्वखर्चाने निर्धारित वेळेत म्हणजेच काही विषयांसाठी स. ११:०० वा.आणि काही विषयांसाठी दु. २:०० वा.अशी वेळ ठरवण्यात आलेली आहे. यावेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे, असे पदव्युत्तर विभागाचे सहा. कुलसचिव पी.ए.कुलकर्णी यांनी कळविलेले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी