नांदेडमधील हजारोच्या संख्येने महिला - पुरुष आक्रोश मोर्चात झाले सहभागी
नांदेड, अनिल मादसवार| हिंदू तरूणींना फसवून, नाव बदलून, लग्न करून, तिचे धर्मांतरण करून व नंतर तिची हत्या करण्याचे षडयंत्र देशभर रचले जात आहेत. तसेच हिंदू समाजाच्या दुर्बल घटकांना अमिष दाखवून, खोटे बोलून, फसवून, अंधश्रध्दाना बळी पाडून त्यांचे धर्मातरण करण्याचा प्रयत्न चालू आहे व तो यशस्वी होतांना दिसत आहे. हे सर्व प्रकार बंद करण्यासाठी कठोरातील कठोर कायदे करण्यात यावे या मागणीसाठी आज नांदेड शहरातून सकल हिंदू बांधवांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात हजारोच्या सांख्येने महिला पुरुष बांधव सहभागी झाले होते.
राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवीण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आम्ही सर्व हिंदू नागरिक या निवेदनाद्वारे आपणांस सुचित करू इच्छितो कि, हे प्रकार त्वरित थांबावेत यासाठी कडक कायदा करण्याची गरज भासत आहे. दिल्लीच्या घटनेत श्रध्दा वालकर हिची निर्घृण पणे हत्या करून तिच्या देहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या घटनेमुळे संपर्ण हिंदू समाज भांबावलेला आहे. नांदेड शहरात एका मुस्लिम मुली बरोबर हिंदू मुलाचे प्रेम प्रकरण चालू असल्यामुळे रागात येऊन जिहादी वृत्तीच्या लोकांनी स्वप्नील नागेश्वर याची निर्घृण पणे हत्या करण्यात आली. या घटनेचे सी.सी.टीव्ही फुटेज उपलब्ध आहे.
या व अशा सर्व प्रकरणात गुन्हेगारांना त्वरित अटक करून कायद्याद्वारे त्यांना त्यांनी केलेल्या गुन्हया बद्दल फासीची शिक्षा व्हावी. अशी भावना आजच्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सकल हिंदू समाज आपणांकडे करत असल्याचे म्हंटले आहे. हे प्रकार असे चालत राहीले तर हिंदू समाज प्रक्षुब्ध होऊ शकतो. त्यामुळे ह्या प्रकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन धर्मांतरण बंदी कायदा, लव्ह जिहाद संबंधी कायदा लागू करावा. आणि अशी सर्व प्रकरणे फास्ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना त्वरित शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर नांदेड जिल्ह्यातील सर्व सकल हिंदू समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.