नांदेड| येथील सेवानिवृत्त शाखा अभियंता अशोक लुटे यांचे सुपुत्र व जि. प. शाळा आंदेगाव ता. हिमायतनगर या शाळेतील कार्यरत शिक्षक पंकज लुटे यांचे दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले!
पंकज लुटे हे अत्यंत मितभाषी, सज्जन स्वभावाचे व होतकरू शिक्षक होते. एक वर्षांपासून ते आजारी होते. त्यांचे वय अवघे ३७ वर्षांचे होते. तरुण वयातच निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधी सायंकाळी गोवर्धनघाट, नांदेड येथे पार पडला. यावेळी नातेवाईक, शिक्षकवर्ग व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै.पंकज यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.