अर्धापूर। तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी गणपतराव तिडके यांची तर व्हाईस चेअरमनपदी नरेंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.
अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सह.साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली, यावेळी शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळला,ईच्छुक उमेदवारांना मुख प्रवर्तक आ.अशोकराव चव्हाण उमेदवारीला उचलण्याच्या सुचना देताच संचालकाची निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली होती,हा जिल्हात विक्रम ठरला आहे,आता चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी कोणाची निवड होणार ही फक्त औपचारिकता राहिली होती.
कारण हा कारखाना अशोकराव चव्हाण यांचा आत्मा आहे, हजारों ऊस उत्पादकांची आर्थिक स्त्रोत हा कारखाना आहे, येथे नियमानुसार काम करणाऱ्या शिस्तप्रिय कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान असते, शनिवारी नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड होती,येथे पदासाठी कोणीच फिल्डींग लावत नाही,कारण अशोकराव चव्हाण ज्यांना संधी देतात तोच पदावर विराजमान होतो. निवडी वेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाचव्यांदा चेअरमनपदी गणपतराव तिडके यांची बिनविरोध निवड झाली तर पहिल्यांदाच संचालक मंडळात एंन्ट्री केलेले नरेंद्र चव्हाण यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली,व्हाईस चेअरमनपदाची प्रा.कैलास दाड यांनी पाच वर्षें उत्कृष्ट काम केले होते,यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी काम पाहिले, यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळासह अधीकरी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांघी उपस्थिती होती.नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर कार्यक्षेत्रातील ऊस वेळेत गाळपासाठी नेण्याचा,ऊस उत्पादकांघे प्रश्न सोडविण्याचे मुख्य काम आहे.