नांदेड। शहरातील वजिराबाद भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे नाव पुर्ववत ठेवावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा गिरीश महाजन यांना रिपाइंचे केंद्रीय सदस्य तथा नांदेड जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.
नांदेड टेक्स्टाइल मिलचे पुनरुज्जीवन करावे किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मिल्सच्या जागेवर रोजगार मिळवून देणारा मोठा प्रकल्प उभारावा,मील एरियातील जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करून नागरिकांना पक्की घरे बांधून द्यावीत, जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मोबदला देण्यात यावा.
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानात ई-पाॅस,बायोमेट्रीक मशिनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे गोरगरिबांना धान्य मिळविणे त्रासदायक होत असल्याने पुर्वीच्याच आॅफ लाईन पद्धतीने धान्य वितरीत करावे या महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर रिपाइंचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष भगवान ढगे,जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे,पुंडलिकराव कांबळे,जिल्हा सरचिटणीस राजु खाडे,संघटक पदमाकर कोकरे,शहराध्यक्ष अशोक खाडे, भैय्यासाहेब गोडबोले, सुरेश हाटकर,मनोज राजभोज ,शेषेराव ढगे,पंकज हाटकर,आनंदराव हाटकर,प्रकाश भोळे,लखन ढगे,निखील हाटकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाची प्रत मा जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात आली याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.