नांदेड। या हिवाळ्यात विक्रमी थंडी पडणार "मायेची उब " उपक्रमात २०२३ ब्लॅंकेट वाटपाचा संकल्प भाजपा नांदेड महानगर, लायन्स सेंट्रल व लायन्स अन्नपूर्णा ने केला असून आत्तापर्यंत २९० ब्लॅंकेटची नोंदणी झाली असून उर्वरित १७३३ ब्लॅंकेट साठी दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
नांदेडकरांच्या सहकार्याने व सदिच्छाने गेल्या तीन वर्षापासून जे वर्ष असेल तितक्या संख्येचे ब्लॅंकेट वाटल्यानंतर आता भाजपा महानगर नांदेड आणि लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा तर्फे आगामी वर्ष २०२३ असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण २०२३ ब्लॅंकेट वाटण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक वर्षी ४० रात्री फिरून रस्त्यावर झोपलेल्या निराधारांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकण्यात येते.लुधियाना येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो पेक्षा जास्त आहे. एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटसह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे. किमान ब्लॅंकेटसाठी चार हजार रुपये खर्च येणार आहे. रबर प्रिंट करण्याचा उद्देश असा आहे की, काही निराधार मिळालेल्या वस्तू दुकानदारांना परत विकतात. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला रहातो.कमीत कमी विस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंटद्वारे
ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी उपक्रम संपेपर्यंत दररोज प्रसिद्ध करण्यात येणार असून चाळीस हजार नागरिकापर्यंत दात्यांची माहिती पोंहचणार आहे. आतापर्यंत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी ५० ब्लॅंकेट ची स्नेहलता महेशराज जायस्वाल हैदराबाद,
रेणुका व मोहित जयप्रकाश सोनी,संजय सितारामजी जाजू,वसंत अहिरे सोनाईनगर,कु.अरुनिता आकाश झवर, लिलादेवी सितारामजी जाजू,अभिलाषा सुमीजी मालपाणी, कै.अनिल लक्ष्मीकांतराव जहागीरदार यांच्या स्मरणार्थ सुवर्णा जहागीरदार,शिवराज विंचुरकर साई ज्वेलर्स सोमेश कॉलनी, नरेश सुनिल काटकर सिडको,शंकर कोंडीबा कस्तुरे आनंदनगर, विश्वजीत मारोती कदम धानोरा ता. कंधार यांनी प्रत्येकी २० ब्लॅंकेट साठी नोंदणी केली आहे.
देणगीदारांनी ९४२१८ ३९३३३ या फोनवर गुगल पे अथवा फोन पे करून रक्कम पाठवावी. तात्काळ व्हाट्सअप द्वारे पावती पाठवण्यात येईल. तसेच भाऊ ट्रॅव्हल्स, कलामंदिर समोर नांदेड येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी कमीत कमी २० ब्लॅंकेट नागरिकांनी देऊन सहकार्य करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा यांनी केले आहे.