हदगाव, शे चांदपाशा| शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाना प्रशासकीय चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून या करिता राज्य शासनाकडुन तक्रार व सुचना पेट्या लावण्याच्या सुचना आहेत. पण हदगाव तालुक्यातील कोणत्याही प्रशासकीय कार्यालय मध्ये सुचना व तक्रार पेटी दिसुन येत नाही यावरुन अधिका-याची कार्यशैलीची प्रचिती येत आहे.
शासकीय निमशासकीय कार्यालय कामकाज काम करण्याची पद्धती बद्दल ञस्त नागरिकांच्या तक्रारी असतात आपल्या सुचना किवा तक्रारीची दखल वरिष्ठ अधिका-यानी घ्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते पण तक्रार पेटीच नसल्याने माञ नागरिकांचा अपेक्षा भंग होताना दिसुन येत आहे. या पुर्वी प्रत्येक शासकीय कार्यालय मध्ये तक्रार पेट्या लावण्यात आलेल्या होत्या. आता माञ 'तक्रार पेट्याच गायब आहेत तर तक्रारी करायच तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालेल आहे.
शहरात महत्त्वाचे कार्यालय आहेत ग्रामीण भागातील नागरिक विविध कामाकरिता येतात पण... शासकीय काम अनेक दिवस थांब या प्रमाणे अनेक नागरिक हतबल झालेल दिसुन येतात. काहीना आधिका-याच्या अरेरवीला समोरे जावे लागते अनेक अधिका-याच्या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडण्याकरिता गुपचूप चिरीमिरीची तक्रारी कुठं करावी. याकरिता कोणतीच संबंधात यंञणेची माहीती कार्यालय मध्ये उपलब्ध होत नाही. यात सर्वसामान्य नागरिकाना फार ञास होतो या करिता प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालय मध्ये तक्रार व सुचना पेट्या बसविण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.