नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, नांदेड केंद्रावर आता मध्यंतरापर्यंत पोहोचली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण आठ नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या आठव्या दिवशी स्नेहल पुराणिक निर्मित, क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “सृजन्मयसभा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. “सृजन्मयसभा” हे नाटक याच स्पर्धेत या आधीही दुसर्या संस्थेकडून सादर झाले आणि हे नाटक नांदेड केंद्रावरून अंतिम साठी पात्र ठरले होते. म्हणून या नाटकाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्यास हे नाटक पात्र ठरले.
लेखकाला एखादी कलाकृती लिहून देताना लेखन करणारी एक व्यक्ती असते, पण लेखन करताना त्याचे व्यक्तिमत्व अनेक परिमितीत दुभंगते, ह्याचे वास्तव व कल्पना दंतकथेतून सुंदर चित्र लेखक रविशंकर झिंगरे यांनी रंगवले आहे.डॉ. अर्चना चिक्षे यांनी साकारलेली “मार्जीनी” आणि किशोर पुराणिक यांनी साकारलेला “मी” हे रसिक प्रेक्षकांना भावला या दोघांच्या अभिनयाची जणू जुगलबंदी चालू आहे.मोनिका गंधर्व यांनी साकारलेली “ती” या पत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
अवास्तववादी, दंतकथेतून निर्माण झालेले हे नाटक अनुष्का पुराणिक सपना वैष्णव यांच्या वेशभूषेतून आणि ऐश्वर्या पुराणिक आणि राजलक्ष्मी देशपांडे यांचे नेपथ्य रसिक प्रेक्षकांना वास्तवात घेऊन जातात हे यांचे यश आहे. मीनाक्षी देऊळगावकर यांनी साकारलेली प्रकाशयोजना आणि समीरण झिंगरे आणि सौरभ वडसकर यांनी साकारलेलं संगीत नाटकाची उंची वाढवते. या नाटकाची रंगभूषा संतोष चिक्षे आणि संकेत पांडे यांनी साकारली तर रंगमंच व्यवस्था प्रसाद देशपांडे, अमोल अंबेकर, उपेंद्र दुधगावकर, उदय कात्नेश्वरकर, सुनीता करभाजन, रेणुका अंबेकर, अनुपमा झिंगरे यांनी सांभाळली. एकंदर स्पर्धेत चुरस वाढत आहे. एका पेक्षा एक सरस नाट्य प्रयोग रसिक प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत.