प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेची खोट्या ॲप वरून शेतकऱ्यांची फसवणूक -NNL

शेतकऱ्यांनी माहिती घेतल्याशिवाय कोणी पैशाची मागणी केली तर बळी पडू नये


हिमायतनगर,कल्याण पाटील|
तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेून दिपक भोयर हा शेलोडा येथील शेतकऱी आहेत. त्यांनी ॲपवर कुसुम सोलार योजनेची आँनलाईन केली आणि ज्या आयडीवर आँनलाईन केली नंतर तिन दिवसानंतर त्यांना पैशाचा भरणा करण्यासाठी सांगितले.  त्या शेतकऱ्यांनी पैसे भरले व नंतर काही दिवसांनी त्यांना कोणत्याही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाली आहे असे कळले. पण त्यांनी आज पर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही परणौ माझ्यासारखी फसवणूक इतरांची होऊ नये.. शेतकऱ्यांनी खोट्या ॲपला कोणत्याही प्रकारची माहिती घेतल्याशिवाय कोणी पैशाची मागणी केली तर शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन फसवणुकीला बळी पडलेले शेतकरी करीत आहोत.

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. वीजेचे मोठे कालावधीचे भारनियमन तसेच अखंडित वीजपुरवठ्याला वैतागलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे.पण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच सोशल मिडियातून होणाऱ्या फसवणुकीचे ग्रहण योजनेला लागले आहे. बनावट वेबसाईट व ॲपतून काही शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याचे प्रकार घडताच आहेत  शेतकऱ्यांना सतर्क केले पाहिजे. असा काही प्रकार होत असल्यास सावध होणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री कुसूम योजनेत शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती (एचपी) कृषीपंपांसाठी अनुदान देण्यात येते. यात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० तर अनुसूचित जाती व अनूसचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान आहे. योजनेत मेडाच्या वतीने स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादी व उद्दिष्टानुसार पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात उद्दिष्टाच्या तुलनेत मागणी करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहे.

याचा फायदा उठवत नेटमाफियांनी बनावट संकेतस्थळ (वेबसाईट) व ॲप तयार केले असून त्यावर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना संपर्क साधून नोंदणी शुल्क तसेच कृषीपंपांची किंमत ऑनलाईन भरणा करण्यास सांगण्यात येत आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे मोबाईल असून फेसबूक व अन्य माध्यमावर आलेल्या अशा बनावट वेबसाईट व ॲपच्या लिंकवर जाऊन काही भागात शेतकरी बळी पडले आहेत. यामुळे शेतकरी फसवणूक मोठ्या प्रमाणात होते आहे. 

शेतकऱ्यांना सतर्क केले असून खोटया व फसव्या संकेतस्थळांसह मोबाईल ॲपला भेट देऊ नये तसेच फसव्या दुरध्वनी, भ्रमणध्वनीच्या संभाषणाला, आवाहनाला बळी पडू नये तसेच अशा संकेतस्थळ व ॲपवर कोणत्याही पद्धतीने पैशाचा भरणा करु नये,   महावितरण कंपनीच्या माध्यमातून किंवा पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने कुसुम सोलार योजनेची निट समजून उमजून माहिती द्यावी नंतर पैसे भरावे अन्यथा आपली फसवणूक होते आहे. तातडीने संपर्क साधा प्रधानमंत्री कुसुम योजना ही राज्य सरकारच्या वतीने फसवणूक होणार नाही यासाठी काही तरी नवीन नियम घालून व लोकांची जनजागृती करण्यात यावी असेही फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने म्हंटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी