२० हजाराहुन अधिक;३२गावे अन कर्मचारी तीनच... लोह्याच्या जिल्हा सहकारी बँकेची अवस्था -NNL


लोहा।
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहा या शाखेत २०हजार २३७ खातेदार असून, लोहा शहर व ३३ गावे आहेत. त्यासाठी बँकेत केवळ तीन कर्मचारी असून त्यांच्यावरच हा सगळा भार आहे. अवघ्या तीन कर्मचारी वर्षभर अतिवृष्टी  अनुदान , पीएम किसान, पीक विमा यासह अन्य शेतकरी अनुदानाचे वाटप करीत असतात .खातेदार शेतकऱ्याच्या बँक खाते व अन्य अनेक अडचणी असतात .एवढेच काय तर अनुदान वाटपाच्या लाभार्थी याद्या बँकेला महसूल विभाग देताना त्यावर बँक खाते सुद्धा पूर्णतः नमूद करीत नाहीत. या व अन्य समस्यांची सोडवणूक करीत बँक ग्राहकांना चांगली सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत असते हे विशेष.

राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना फारसे सहकार्य करीत नाही थोड्याही त्रुटी असेल तर ते शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकत नाहीत व संबधित विभागाने अनुदान वाटपात शेतकरी व इतर  लाभार्थी यांच्या याद्या दिल्या तर त्यात बँक खाते नसतील तर या राष्ट्रीयीकृत बँका त्या याद्या स्वीकारत नाहीत पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मात्र महसूल विभाग किंवा  विभाग शेतकरी लाभार्थ्यच्या याद्या देताना संबधित शेतकरी यांचे बचत खाते नंबर नोंद करून परिपूर्ण अद्यावत याद्या देत नाहीत.

शिवाय खातेदारांचे आधार ,केवायसी जोडणी नसते काही खातेदार संयुक्तिक असतात काहींचे निधन झालेले असते काही जणांकडे आधार नसते पासबुक नसते घरगुती वाटणी वाद असतो असा अनेक समस्यांना तोंड देत हे बँक कर्मचारी शेतकऱ्यांचे अनुदान त्याच्या खात्यात जमा करतात शिवाय संख्या अधिक आणि कर्मचारी दोन तीन असा परिस्थितीतही हे कर्मचारी काम करतात एवढेच काय तर सेवकही नसतो असा अडचणीतुन काम करत हे कर्मचारी वेळेवर सेवा देतात. राष्ट्रीयकृत बँकेत वेळ संपली की, कोणतेही काम करत नाही उद्या या असे सांगून व्यवहार बंद करतात आणि आपण गुमान ते ऐकतो व जातो पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मध्ये मात्र वेळेच्या नंतरही कर्मचारी काम करतात सेवा देतात एवढे करूनही लोक तक्रारी करत असतात.
   
बँकेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी तसेच अनुदान वाटपाच्या लाभार्थी याद्या अद्यावत करून द्यायला जिल्हा बँक प्रशासनाने सांगणे गरजेचे आहे जेणेकरून कर्मचाऱ्या वरील ताण कमी होईल व वेळेत वाटप होण्यास मदत होणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे .बँक कर्मचारी आहे. त्या परिस्थितीत व अल्प मनुष्यबळा वर काम करीत आहेत. 

पण शेतकरी लाभार्थी याद्या बाबत अद्यावत यादी देण्यासाठी जिल्हाधिकारी वा तहसीलदार यांना बँक प्रशासन तसेच पदाधिकारी यांनी सांगितले तर काम आणखी चांगले जलद होईल पण सोबतच कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. लोहा शाखेत २०हजाराहून अधिक बँक खातेदार आहेत कर्मचारी केवळ तीन , मूलभूत सुविधांचा अभाव गावे 33 आणि त्यात या अनेक खातेदार शेतकऱ्याच्या बँक खाते त्रुटीत असा अवस्थेत या कर्मचाऱ्यांची ग्राहकांना सेवा मिळते त्याची सकारात्मक नोंद व्हायला हवी कर्मचारी वाढविणे आवश्यक आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी