नांदेड। जानेवारीत धान्य वितरण करण्यास नवीन मशीन देण्यासंदर्भात मागणीस होकार देऊन मंत्रालयात अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, उपसचिव नेत्रा मानकामे, उपसचिव गजानन देशमुख, अव्वर सचिव कोळेकर दिपक आत्राम यांच्या समवेत २ नोव्हेंबर रोजी मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली, यावेळी विविध मागण्यांवर चर्चा झाली.
अखिल महाराष्ट्र रास्त भाव दुकानदार संघाने मराठी पत्रकार भवन येथे २ नोव्हेंबर बैठक झाली व यांच्या समावेत बैठक करण्यात आली होती. त्या बैठकीला संबंधित विभागाचे उप सचिव माननीय नेत्रा मानकामे,उपसचिव गजानन देशमुख अवर सचिव कोळेकर , दिपक आत्राम सागर कारंडे यांच्य समवेत अखिल महाराष्ट्र संघाने पुणे मा प्रधान सचिव यांनी. मुदेसुद मागण्या ऐकून घेतल्या मशीन बाबत लवकर सुधार करण्यात येईल फोरजी नेटवर्क व जानेवारी २०२३ पर्यंत नवीन मशीन उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी कळविले.
धान्य ज्या त्या महिन्यात देन्याचा प्रयत्न करू होईल, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्रधान मंत्री योजनेचे कमीशन देण्या बाबत तत्काळ सूचना देण्यात येतील. धान्य ज्या वेळेला दुकानात त्याच वेळेला मशीन मध्ये आपलोड करण्यात येईल आनंदाचा शिधा ऑफलाईन करावे व इतर योजनेच्या धान्यला आढावा घेऊन मुदत वाढ देण्यात येईल केंद्र सरकारने २० पैसे कमीशन मंजूर केले आहे परंतु महाराष्ट्र सरकारने वाढ करुन दोन रुपये करण्यात यावे मा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव भेट घेऊन निवेदन दिले व माहिती दिली ना रविद्र चव्हाण सकाळी भेट घेऊन माहिती दिली मुख्य सचिव समोर विषय ठेवण्यात आला आहे.
तसेच कॅबीनेट पुढे हा विषय ठेऊन पाठपुरावा करण्यात येईल, या बैठकीला राज्य अध्यक्ष डि .एन पाटील, राजेश अबुसकर, कॉ चंद्रकांत यादव, विजयकुमार पंडीत, रमेश गाजांपुरकर, रफीक शेरखान, कौस्तुभ जोशी, अशोक कापसीकर, देशमुख, गणेश डागी, शेख इरफान, राधेश्यामकुलवाल, मधुकर बरडे व सौळा जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व इतर राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच गणेश डांगी यांनी पुणे शहरातील परिस्थितीची माहिती सचिव दिली व तत्काळ पुण्यात बैठक घ्यावी विनंती केली.