कंधार, सचिन मोरे। कृषि उत्पन्न बाजार समिती कंधार च्यावतीने शेतकऱ्यांचे धान्य शासकीय दराने खरेदी सुरू करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी आ. भाई गुरुनाथराव कुरुडे यानी उपविभागीय अधिकारी कंधार याच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यावर्षी कंधार तालुक्यामध्ये पावसाने मोठे थैमान घातले परतीच्या पावसाने जाता जाता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करुन गेला अतीवृष्टीने या भागातील शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयाचे नुकसान होऊन हाता-तोडांशी आलेला घास हिरावून घेतला या बाबतीत शासनाने नुसती घोषणा करुन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना गाजर दाखवले दिवाळी नंतर शेतकऱ्याच्या खाजगी माल बाजारात येत असुन तो बेभाव खरेदी होऊन शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे.
कंधार येथे आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नातुन मार्केट कमेटी सुरू केली असुन आता मार्केट कमेटी मार्फत सरकारी भावाने माल खरेदी करणे गरजेचे जरुरी आहे आज पर्यत आधी अधीक-अधीक माल खाजगी आडत्यांनी बेभाव दराने खरेदी केला आहे. या बाबतीत तात्काळ लक्ष घालुन शासकीय दराने धान्य खरेदी सुरू करुन उपेक्षित शेतकऱ्यांस न्याय द्यावा अशी मागणी माजी आ. गुरुनाथरावजी कुरुडे यांनी केली आहे.