नांदेड| श्री. गुरुनानक देवजी यांचे संदेश हे जगाला तारण करणारे आहेत. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे केले.
गुरु नानक देव यांच्या ५५३ व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री. गुरूगोबिंद सिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित गुरुनानक देवजी यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, गुरुनानक देवजी यांनी सर्व समाजाला एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, श्री. गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राचे समन्वयक लड्डू सिंग महाजन, सरदार गुरुबचनसिंग शिलेदार, सरदार रवींद्र सिंग मोदी, सरदार इद्रजित सिंग संधू, सरदार रणबीर सिंघ रामगडीया, डॉ. परविंदर कौर महाजन, डॉ. अविनाश कदम, डॉ. दीपक पानसकर, डॉ. सुरवसे, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. डी. डी. पवार, डॉ. दीपक शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सरदार रवींद्र सिंग मोदी व डॉ. परविदर कौर महाजन यांनी गुरुनानक देवजी यांच्या कार्याची माहिती सांगणारी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमरप्रीत कौर रंधावा यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.