अर्धापूर। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दि.२५ रोजी शुक्रवारी लहान येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिबिरामध्ये नांदेड येथील १५ तज्ञ डॉक्टरांनी ४१७ नागरिकांची मोफत तपासणी करून उपचार केले
यावेळी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड, अपेक्षा क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नांदेड आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन हॉस्पिटल नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रूग्णांची मोफत तपासणी करुन उपचार केले आहे.
बसवेश्वर मंदिर सभागृह येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरामध्ये डॉ.विक्रम मानूरे (निरोसर्जन) डॉ.स्मिता तुमवाड (मानूरे) (मेडिसिन विभाग), डॉ.सचिन आनेवार (बाल रोग तज्ञ) डॉ. राहुल महागावकर (मेडिसिन विभाग व भूलतज्ञ) , डॉ.मुजाहिद खान (छाती रोग तज्ञ) , डॉ.रमण तोष्णीवाल (अस्थिव्यंग उपचार शास्त्र तज्ञ), डॉ. वैभव चंदापुरे (मेडिसिन विभाग तज्ञ), डॉ.प्रणिता आडे (अतिदक्षता विभाग तज्ञ, गोदावरी हॉस्पिटल नांदेड) डॉ. शेजान फौजदार सर्जरी विभाग), डॉ. दीपक कुमार (कान नाक घसा विभाग तज्ञ), डॉ.कार्तिक कोल्हे (नेत्र विभाग तज्ञ), डॉ.धनश्री केळकर (स्त्री रोग तज्ञ विभाग),
डॉ.स्नेहा नित्य पवार (स्त्री रोग तज्ञ), गजेवाड एस डब्ल्यू (औषध निर्माण अधिकारी), डॉ. शुभम हांडे (अतिदक्षता विभाग अपेक्षा हॉस्पिटल नांदेड), बिंबिसार गायकवाड (शिबिर समन्वयक अधिकारी),डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड , रेणुका मॅडम (शिबिर समन्वयक अधिकारी गोदावरी हॉस्पिटल नांदेड), गजानन गुंडे (शिबिर समन्वयक अधिकारी अपेक्षा हॉस्पिटल नांदेड) , केशव चोपडे, विकास टोम्पे, मनीष शेळके, संतोष कोकणे साक्षी,पल्लवी, संतोष वाघमारे,संतोष पुंडे यांनी रुग्णाची तपासणी करून उपचार केले.
शिबिरास सरपंच अमोल इंगळे, उपसरपंच शेख महबूब, तसेच नांदेड येथील कार्यरत असणारी महात्मा ज्योतिराव फुले योजना व एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत डिस्ट्रिक्ट टीम येथील कार्यरतअधिकारी, डॉ. प्रेम किशोर वाळवंटे (DMO) व जिल्ह्याचे प्रमुख स्वप्निल देशमुख, यांच्यासह आरोग्यमित्र शफिक व गंगात्रे, आदी टीम उपस्थित होते. सदरील महा आरोग्य शिबिरामध्ये एकूण ४१७ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यामधील ४१ पेक्षा अधिक रुग्णांना पुढील उपचाराकरिता संबंधित रुग्णालयामध्ये पाठवण्यासाठी सांगण्यात आले आहे.
शिबिरात रुग्णाची तपासणी, शुगर तपासणी, रक्तगट तपासणी व छातीची पट्टी ईसीजी मोफत करण्यात आली तसेच आभा कार्ड नोंदणी व प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड नोंदणी मोठ्या संख्येने करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वितरण करण्यात आले. जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर डॉ. दीपेश कुमार शर्मा, जिल्हा समन्वयक, शरद पवार (Cluster Head) यांच्या मार्गदर्शन व योगदानामुळे सदरील महा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष पुंडे, कपिल पुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले