हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रतीचे पूजन तसेच संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन व 'संविधान दिन' व्याख्यानाचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्टाॅफ सेक्रेटरी व समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ डी. के. कदम व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ एल. बी. डोंगरे हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे हे होते.*_
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रनिर्माते संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर मंचावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व तदनंतर मंचावरील प्रमुख पाहुण्यांच्या मनोगत झाले. सुरुवातीला मंचावरील उपस्थित असलेले पहीले पाहुणे डॉ. डी. के. कदम यांनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी आपले मनोगत साध्या सोप्या भाषेतून समाज शास्त्राच्या दृष्टीकोणातून मांडण्याचा प्रयत्न केला.
तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. एल. बी. डोंगरे यांनी भारतीय संविधानावर भाष्य करताना संविधान उद्देशिकेचे अतिशय उत्तम रीतीने विश्लेषण केले. तद्नंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी केला. तसेच सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. हाके सर यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.