संविधान संस्कृती रुजवणे काळाची गरज -NNL


नांदेड/परभणी।
स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या जीवनमूल्याची पेरणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये . संविधान करत असते. महात्मा फुलेनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात प्राथमिक शिक्षण हे मोपत्रिका व सक्तीचे करण्याची मागणी केली होती. त्याचे कायद्यात रूपांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्यामुळे आज शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचू शकल्यामुळे संविधानाची जनजागृती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलदिप सूर्यवंशी यांनी केले. 

पुढे बोलताना म्हणाले की विविधतेने समृध्द असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान संस्कृती देशात रुजणे व संविधानाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण ही काळाची गरज आहे असेही कुलदीप सूर्यवंशी बोलताना म्हणाले 


तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील जिल्हा परिषद ज्ञानरचनावादी उच्च प्राथमिक शाळा येथे संविधान दिननिमित्त विविध स्पर्धा आयोजित करून सहभागी बालकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलदीप सूर्यवंशी बोलत होते. तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार या संस्थेच्या अध्यक्षा सौ चित्रा सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्ताविकाचे वाचन करुन संविधान जनजागृती करण्यात आली.


याप्रसंगी शाळेचे कर्मचारी मुख्याध्यापक व्ही.एम.सुरनर,कदम आर.पी सर, सय्यद अकबर सर ननुरे ज्ञानदेव यांनी मनोगत व्यक्त केले यासमयी आंदेलवाड गंगाधर, गडगिळे आर. एस, सावकार एस. के, श्रीमती शिंदे व्ही. एच,श्री हातागळे आर. पी, आरळे. व्हीं. जी, गदिगुडे यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी