विधानसभा अध्यक्षांकडून ऋतुजा रमेश लटके यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ -NNL


मुंबई|
विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा रमेश लटके यांना आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

विधानसभेचे सदस्य रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेवर नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा रमेश लटके या निवडून आल्या आहेत.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब, विधानसभा सदस्य सुनिल प्रभू याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्षांचे सचिव राजेश तारवी, महेंद्र काज आणि सन्माननीय सदस्यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी