नांदेड। हरबरा, ज्वारी ,गहू या रब्बी पीक पेरणी व ऊस लागवड हंगामाच्या काळातच अन्यायकारक रित्या सक्तीने वीज बीले वसुल करत वीज तोडनी चालु असल्यामुळे शेतकर्यात तीवृ असंतोस पसरला आहे. अगोदरच शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झालेला आसल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्ये सहसंपर्कप्रमुख भुंजग पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नवा मोढा नांदेड यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन तात्काळ तोडणी थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात शेतकरी नैसर्गिक आपत्ती मुळे त्रस्त असुन, दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र सुरू आहे. त्यातच ऐन गहु, हरबरा, ज्वारी या रब्बी पिकांच्या पेरणी हंगामाच्या काळातच विद्युत मंडळाने अत्यंत अन्यायकारक निर्दयीपणे शेतकऱ्यांच्या मोटारीचे सक्तीने विज बिल वसुल करण्याच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला आहे.
२४ तासात फक्त ८ तासच वीजपुरवठा केला जातो तेही मनमानीपणे केव्हाही रात्री बेरात्री हा प्रकार अत्यंत अन्यायकारक आहे या शेतकरी वीरोधी सरकारने व वीज वितरण कंपनीने शेतकर्यांचा छळ तात्काळ थांबवला नाही तर शिवसेना, नांदेड जिल्हयाच्या वतीने अत्यंत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहसंपर्कप्रमुख भुंजग पाटील डक,दता पाटील,प्रकाश मारावार,माधव पावडे, नेताजी भोसले,नरहरी वाघ,मारोतराव धुमाळ,माधव पांचाळ, कौसल्य,किशन फटाले,अर्जुनसिंह ठाकुर, गजानन हाटकर, अभिजित भालके, अँड.वट्मवार, बालाजी पाटील भायेगावकर,यांच्या सह शेतकऱ्यांनी केली आहे.