सामूहिक हनुमान चालीसा पठन व भव्य भजन संध्या कार्यक्रम जल्लोशात साजरा -NNL


नांदेड।
विश्व हिन्दू परिषद बजरंग दलने हिन्दू एकत्रीकरनासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे ते मनजे प्रत्येक महिन्यात नांदेड शहरात व नांदेड जिल्ह्यात प्रत्येक भागात सामूहिक हनुमान चालीसा पठन व भव्य भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. प्रथम हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी विणकर कॉलनी चौफाळा दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ पार पाडला. याचे आयोजन चौफाळा भागातील हिंदुत्ववादी संघटना जय श्रीराम सेना चौफाळाने केले होते व भजन संध्या कार्यक्रमात श्री संजीवनी भजन मंडळाने भजन सादरीकरण केले.


ह्या कार्यक्रमाची प्रसिद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली त्यामुळे हिन्दू समाज व प्रत्येक हिन्दू संघटना मोठया संख्येने ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. विशेष करून मातृशक्ती व दुर्गाशक्ती चा सहभाग मोठ्या प्रमानात होता. जेंव्हा भजन संध्या कार्यक्रम चालू झाला भजनाच्या हरी नामात सम्पूर्ण हिन्दू समाज आनंदाने आणी जल्लोशात मग्न झाला. तसेच 29 नोव्हेंबर रोजी ने निघणाऱ्या आक्रोश मोर्चा विषयी व 3 नोव्हेंबर रोजी गीता जयंती (शौर्य दिवस )निमित्त होणाऱ्या सामूहिक हनुमान चालीसा पठण व भव्य भजन संध्या विषयी सूचना देण्यात आल्या. ह्या कार्यक्रमात इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धबडगे सर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याबाबत त्यांचा विशेष सत्कार सुद्धा करण्यात आला.शेवटी हनुमान चालीसा पठण करण्यात आले व नंतर महाआरती सुद्धा झाली.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी