जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल -NNL


नांदेड|
गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. नर्सीकडुन नांदेडकडे जाणे-येण्यासाठी  सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर ते ढवळे कार्नर जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर - वाजेगाव-देगलुर नाका- बाफना- रेल्वे स्टेशन जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. 

महाराणा प्रताप चौकाकडुन बाफना टि पॉईन्टकडे येणारी व जाणारी तसेच महाराणा प्रताप चौकाकडुन हिंगोली गेट व चिखलवाडीकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशन- शिवाजी महाराज पुतळाकडुन गांधी पुतळयाकडे जाणारी व वजीराबाद चौकाकडे येणारी वाहतुकीसाठी बंद राहील. महावीर चौक ते शिवाजी महाराज  पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. महावीर चौक ते वजीराबादकडे  जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. जुना कौठा- रामसेतु पुल -तिरंगा चौक -वजीराबाद चौक कडे येणारी वाहतुक वजीराबाद चौक ते आायटीआय चौक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. 

आायटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. परत आायटीआय चौक ते राज कार्नर-आसना ब्रिजकडे जाणे-येण्यासाठी पुर्ण पणे बंद राहील. आसना ब्रिज ते शंकरराव चव्हाण चौकाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील.  भोकर फाटा ते नांदेड कडे येणारी वाहतुक आसना ब्रिज पर्यंत बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. नागपुर- हिंगोली कडून येणारी -जाणारी वाहतुक - भोकर फाटा- भोकर- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी-  बिलोली-  देगलुर, नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक - भोकर फाटा- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा- बिलोली -तेलंगाना येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. 

जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -गडगा- कौठा- कलंबर- उस्मानगर- नांदेड येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -कासराळी- कारेगांव फाटा- उमरी- मुदखेड- नांदेड येण्या-जाण्यासाठी  वाहतूक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर-दुध डेअरी-साई कमान/ नावघाट पुल ते जुना मोंढा येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर- संभाजी चौक- लातुर फाटा - लातुर-लोहा येणारे-जाणारे वाहन तसेच जुना मोंढा कडे येणारे वाहतुक चालु राहील. वजीराबाद चौक ते राज कॉर्नर कडे जाण्या-येण्यासाठी  तिरंगा चौक- लालवाडी अंडर ब्रिज- महावीर सोसायटी- गणेश नगर वाय पॉईन्ट- पावडेवाडी नाका मोर चौक- छत्रपती चौक ते राज कार्नर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील.

 शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. आसना ब्रिज पासुन ते भोकर फाटा-वसमत फाटा- ते अर्धापुर व जिल्हा बार्डर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. येळेगांव फाटा ते भोकर फाटाकडे येणारी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. 

नागपुर कडून येणारी -जाणारी वाहतुक हदगांव- भोकर- बारड- मुदखेड- नांदेड- येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. राज कार्नर- तरोडा नाका- पासदगांव- कासारखेडा- मालेगांव मार्गे वसमत/हिंगोली येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. नमस्कार चौक- मालटेकडी -शंकरराव चव्हाण चौक-  मुदखेड- बारड- भोकर- हदगांव येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. भोकर- बारड- मुदखेड- वाजेगांव/ शंकरराव चव्हाण चौक- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील, असे पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी