जिल्हा क्रिडा कार्यालयाचा युवा पुरस्कार; 4 वर्षापासून युवा पुरस्कार रखड़ले -NNL


नांदेड।
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे असून, जिल्ह्यातील युवांना जिल्हा युवा पुरस्कार न देता ते प्रलंबित ठेवतात. नाही तर वरिष्ठ कार्यालयाकडून काही आदेशच आला नाही असे म्हणत वादात अडकवतात.हि परंपरा गेल्या चार वर्षापासून कायम असून यंदा २६ जानेवारी किंवा १ मे ला क्रिडा पुरस्कार देणे अपेक्षित होते.परंतु आजपर्यंत जिल्हा क्रिडा कार्यालयाकडून याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे जिल्ह्यातील युवक,युवती व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे.    

नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यासाठी नांदेड येथे जिल्हा क्रिडा कार्यालय आहे.या कार्यालयामार्फत शालेय स्तरावरील विविध क्रिडा प्रकाराचे स्पर्धा घेणे,एकविध क्रिडा संगठनांना मान्यता देणे,क्रिडा शिक्षकांना प्रशिक्षण देणे,शाळा व महाविद्यालयातील मैदान तयार करणे,व्यायामशाळांना साहित्य देणे व बांधकाम ला अनुदान देणे,खेळांडूंना ग्रेसगुण देणे यासह केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी निघालेले परिपञक,आदेशाची अंमलबजावणी तसेच खेळ,क्रिडा संबंधी योजना राबविणे.यासह जिल्हा क्रिडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळांडू,गुणवंत प्रशिक्षक,संघटक,कार्यकर्ता यांना पण पुरस्कार दिले जातात.प्रस्ताव आल्यानंतर त्याची छाननी केल्यानंतर जिल्हा युवा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर पुरस्कार्थींचा सम्मान केला जातो.दरवर्षी जिल्ह्यातिल सर्व युवक,युवती व सामाजिक संस्था अश्या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

हे पुरस्कार मिळविण्यासाठी जिल्ह्यातिल युवक,युवती,संस्थेचे प्रतिनिधी विविध क्षेञात वर्षभर सेवाभाव वृत्तीने परिश्रम,तयारी, मेहनत करतात.माञ अंदाजे चार वर्षापासून जिल्हा युवा पुरस्काराची प्रक्रियाच राबविण्यात आली नाही.नांदेड जिल्ह्यातील लगतच्या जिल्ह्यामध्ये पुरस्कार देण्यात आले.माञ आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना युवा पुरस्कारापासून वंचितच ठेवले जात आहे.पुरस्कार प्राप्त यांचा सन्मान तर प्रलंबित राहते,नाही तर पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत वाद तर निर्माण होतो किंवा ती संपुर्ण प्रक्रियाच रद्द करण्यात येते असा प्रकार येथील क्रिडा कार्यालयात जवळपास गेल्या चार वर्षापासून सुरु आहे.

जिल्हा क्रिडा कार्यालयास दोन वर्ष कोव्हीड-१९ मुळे पुरस्कार देता आले नाही.तर दोन वर्ष पुरस्कारासाठी नामाकंन अर्ज प्रस्ताव मागवून पण पुरस्कार दिले नाही.तर पुरस्कारासाठी आलेला निधीही परत पाठविण्यात आल्याची माहिती ही कार्यालयाकडूनच प्राप्त झाली आहे.जिल्हा कार्यालय आता चालु वर्षाचे म्हणजेच 2022 या वर्षाचे  एकञित पणे असे चार वर्षाचे पुरस्कार एकदाच वितरित करणार कि? फक्त चालू वर्षाचे पुरस्कार देणार ते बगावे लागेल.याबाबतीत जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी पुरस्कारासंबंधी 

लवकरात लवकर प्रक्रिया राबवून पुरस्कार जाहिर करावा अशी मागणी युवा वर्गातून होत आहे.याबाबत नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंञी तथा राज्याचे क्रिडामंञी हे नियोजन समितीच्या बैठकीस नांदेड येथे आले असता त्यांना स्थानिक युवकांनी प्रलंबित असलेल्या  युवा पुरस्काराबद्दल जिल्हा क्रिडा कार्यालयाची उदासितेबाबत सविस्तर माहिती दिली.मी स्वतः लक्ष देऊन पुरस्कारासंबंधी पुढच्या दौ-यात आपण याबाबत स्वतंत्र बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पालकमंञ्यांनी भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले असल्याचे माहिती मिळाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी