नवीन नांदेड। नांदेडच्या 'हडको' परिसरातील लहुजी साळवे सांस्कृतिक सभागृहात १४ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, यानिमित्ताने मान्यवरांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
प्रारंभी,आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे सांस्कृतिक सभागृहात लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस तथा अर्धाकृती पुतळ्यास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव धिरर्डीकर, आनंदा गायकवाड, मेजर हरिश्चंद्र गोपले, जनार्दन गुपिले, राजू लांडगे, दिगांबर शिंदे, प्रा.डॉ. नामदेव वाघमारे, प्रा. हनुमंत वाडेकर, पप्पु उर्फ सूर्यकांत गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकणीकर, आनंदा वाघमारे, सखाराम गजले, उद्योजक माधवराव डोंपले, बालाजी पाटोळे, पांडुरंग सूर्यवंशी, शाहीर गौतम पवार, बाबु कांबळे,केशव कांबळे,नारायण गायकवाड ,प्रदीप हनवते यांच्या सह उपस्थित जणांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, म. ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच साहित्यसम्राट शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मेजर हरिश्चंद्र गोपले यांच्या हस्ते नवीन नांदेडातील लहुजी साळवे सभागृहाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.