नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 42मालमता प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, या पोटी मनपा प्रशासनास 29लाख 47हजार 332रूपये मालमत्ता कर वसूल झाला असून, एकूण प्राप्त नोटीस एक हजार पैकी 928 नोटीसा सहाय्यक आयुक्त डॉ रईसौदीन यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक व वसुली लिपीक यांनी वाटप केल्या होत्या.
12 नोव्हेंबर 22रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडुन नांदेड शहर महानगरीपालेकेत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते, मालमत्ता कराविषयी धारकांना आपल्या तक्रारीचे निवारण करून घेण्यासाठी सुचित करण्यात आले होते. मालमत्ता कर भरणा करून महापालिलेका सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
राष्ट्रीय लोक अदालत एस.एल.येलटी सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मनपाचे आयुक्त डॉ सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार,भरत राठोड,विधी अधिकारी अजित पाल संधु सहाय्यक आयुक्त कर सदाशिव पंतगे,व सहा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व संबंधित कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या ऊपसिथीत आयोजन करण्यात आले होते.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एक हजार नोटीसा प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी नऊशे आठविस थकबाकीदार यांना नोटीस वाटप सहाय्यक आयुक्त डॉ रईसौधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक सुधीर बैस,दिपक पाटील, सुदाम थोरात , वसुली लिपीक मारोती सांरग,मालु एनफळे, मारोती चव्हाण,संदीप धोंडगे, सुखदेव जौधळे, भदरगे नथुराम चवरे, सुधीर कांबळे, राजपाल सिंग जक्रीवाले, पानपटे, पवळे,प्रकाश दर्शने, कोल्हे यांनी वाटप केले होते,या पैकी राष्ट्रीय अदालती मध्ये 42मालमता धारकांनी 29लाख 42हजार 323रूपयाचा मालमत्ता कर भरला आहे.
ज्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही त्यांनी 31 नोव्हेंबर 22 पर्यंत शास्ती माफी योजना चालू असुन शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन मनपा प्रशासनानास सहकार्य करावे व जप्ती टाळावी असे आवाहन आयुक्त डॉ सुनिल लहाने व सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ रईसौधदीन यांनी केले आहे.