हिमायतनगर। आज हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात सकाळी ठीक १०.३० वाजता 'क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत कदम लाभले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्त्यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारक, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे जीवन कार्यावर व त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात डॉ.उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी ' क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा त्याग व देशासाठी त्यांनी केलेले समर्पण, बलिदान याची नवीन पिढीने जान ठेवावी. आपले आरोग्य सांभाळून शिक्षण व उद्योग धंद्यात प्रगती करावी असे सांगितले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आशिष दिवडे यांनी केले तर डॉ सविता बोंढारे यांनी सर्वांचे आभार मानले.