हिमायतनगर। दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाने र्कौमी एकता सप्ताह दि.१९ते २५नोव्हेंबर या दरम्यान सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला.
याची सांगता करताना प्रमुख म्हणून डॉ. डी. के.कदम (स्टॉफ सेक्रेटरी व समाजशास्त्र प्रमुख),दुसरे वक्ते म्हणून डॉ.वसंत कदम(इतिहास विभाग प्रमुख) हे होते.महाविद्यालयातील या सप्ताहात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सविता बोंढारे व सांस्कृतीक विभाग प्रमुख सहायक प्रा.आशिष दिवडे यांनी विशेष मेहनत घेतली. त्या अनुषंगाने शनिवार दि.१९रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला.या दिवशी भारताच्या पहील्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करून धर्मनिरपेक्षता या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.
दि. २०रविवार रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा करण्यात आला,यात अल्पपसंख्याकांच्या कल्याणासाठी१५कलमी कार्यक्रमावर भर देण्यात आला. दि.२१सोमवार रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात आला,या दिवशी भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसा परीचय करून देण्यासाठी कवी संमेलन घेण्यात आले, दि.२२ मंगळवार रोजी, दुर्बल घटक दिवस तर दि.२३बुधवारी सांस्कृतीक एकता दिवस, दि.२४गुरुवारी महिला दिन, यात महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान सांगण्यात आले. शुक्रवार२५रोजी जोपासना दिवस साजरा करण्यात आला.यात पर्यावरणाची जोपासना व जाणीव या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.
या सप्ताहास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सर्व कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. चहा व अल्पोपहाराने ज्ञानाच्या या कौमी एकता सप्ताहाची समाप्ती झाली.