नविन नांदेड| संत ज्ञानेश्वरी संजिवनी सोहळ्या निमित्ताने अंखड हारिनाम सप्ताह व हनुमान मंदिर मुर्ती स्थापन वर्धापनदिन सोहळा निमित्ताने हभप कथाकर सौ.रूपाली सवणे परतुरकर यांच्या मधुर वाणीतून 22 ते 29 नोव्हेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे या सहाव्या वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,यात अखंड हारिनाम सप्ताह निमित्त दैनंदिन सकाळी काकडा भजन, ज्ञानेशवरी पारायण,गाथा भजन , तुकाराम चरित्र, सायंकाळी हारिपाठ व सायंकाळी सात ते दहा पर्यंत हभप सौ.रुपालीताई सवणे परतुरकर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे, या अखंड हारिनाम सप्ताह मध्ये 22 रोजी हभप किशन महाराज बरबडेकर यांच्ये संजिवन सोहळा निमित्ताने गुलाबाचे किर्तन आकरा वाजता आयोजित केले आहे तर २९ नोव्हेंबर रोजी काल्याचे किर्तन सकाळी आकरा ते एक वाजता हभप रूपाली ताई सवणेकर यांच्या झाल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला व्यासपीठ प्रमुख माधव ठाकूर, शिवाजी मुंडकर, गोपीनाथ पवार, प्रल्हाद कदम तर व मृदुंगचार्य कृष्णा मारतळेकर,बाळू महाराज ऊमरा,बाळु महाराज घुंगराळा ,ऊतम किन्हाळकर, गोविंद पवार,गायनाचार्य मुंजाजी पाटील, एकनाथ पाटील, तुकाराम पाटील, मनोहर पाटील,ज्ञानोबा पाटील, पांडुरंग पाटील, गंगाधर कोल्हे,आंनदराव कदम,उमाजी पवार ,शिवानंद कल्याणे, यांच्या सह अनेक जणांची व ग्रामीण भागातील अनेक गावातील भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी तुप्पा यांनी केले आहे.