.....अन्यथा शेतकऱ्यांच्या समर्थानात रस्त्यावर उतरावे लागेल - आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

महावितरणच्या हिटलरशाही कारभारावर जवळगावकरांनी महावितरण अधिकाऱ्यास सुनावले


हदगाव/हिमायतनगर|
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याना प्रचंड नुक
सानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे खरिपात झालेला खर्चही निघाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आता रब्बी पिकावर आहे. मात्र यातही महावितरणने तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याची भाषा सुरु केली आहे. याबाबत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महावितरण अधिकाऱ्याशी संवाद साधून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये. अन्यथा आम्हाला रस्त्यावर रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला आहे.


हदगाव- हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगाम अतिवृष्टीच्या पावसाने नुकसानीत आला आहे. झालेल नुकसान कसं भरून काढावं आणि बि-बियाने, खते, औषधी उधारीची परत फेड कशी करावी या चिंतेत शेतकरी आहे. या संकटाचा सामना करून रब्बीतून नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. मात्र यातही महावितरणने खोडा घालत ऐन पाणी देण्याच्या वेळेला वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम उघडली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हतबल झाला असून, वीज पुरवठा खंडित झाल्याने पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात दिवस ढवळ्या वीज चोरी होताना बघ्याची भूमिका घेणारे अभियंते आता शेतकऱ्याना वीज बिल भरण्याचा तगादा लावत वेठीस धरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खरे पाहता महावितरणने हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबत कुठलीही नोटीस किंवा पूर्व सुचना दिली नाही, आणि थेट वीज पुरवठा खंडित करण्याची भाषा करत आहेत. 


याबाबत अनेकांनी आमदार माधवराव पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यांनतर जवळगावकरांनी थेट अभियानात्यां
ना धारेवर धरत वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा. आणि शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची मुभा द्या, शेतकरी बिल भरतील मात्र यासाठी सक्ती करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे म्हणत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दूरध्वनीवरून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले आहे. यानंतरही वीज पुरवठा खंडित झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या हिटलरशाही कारभाराच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता तरी शेतकऱ्याचा महावितरणकडून केला जाणारा खंडित वीज पुरवठ्याचा प्रकार थांबेल काय.? याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.

खरीप हंगाम गेला असून, आता रब्बी हंगामात तयारी चालू आहे, अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, सूर्यफूल, करडई, यासह विविध पिके घेतली आहेत. सध्या थंडीचा जोर वाढला असून, यामुळे रब्बी हंगाम चांगला होईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे. पिके जोमात यायची झाली तर पिकांना पाणी देने अत्यंत आवश्यकता आहे. परंतु ऐन मोक्याची संधी साधून महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणण्याचा हिटलरशाही कारभार सुरु केला आहे. जर शेतकऱ्यांची विद्युत पुरवठा खंडित झाला तर नाईलाजाने शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी