भोकर हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने माहुर लवकरच बस चालु होणार -NNL

आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी विभागीय वहातुक अधीकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क  केला 


हिमायतनगर, चांदराव वानखेडे|
भोकर-हिमायतनगर-पळसपुर-ढाणकी-उमरखेड मार्गे माहुर बससेवा लवकरच चालु होणार आहे. अशी माहिती हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली. याबाबत त्यांनी विभागीय वहातुक अधीकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून माहिती घेतली आहे. 

माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळ यांनी भोकर माहुर मार्गे हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने बस सुरू करण्यासाठी विभागीय वहातुक अधीकारी म.रा.प.महामंडळ दि.16.11.2022रोजी निवेदन देऊन केली होती. त्यानंतर आ.माधवराव पा.जवळगावकर यांची सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी भेट घेऊन भोकर हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने माहुर बस चालु करण्याची विंनती केली. याची दाखल घेत तात्काळ त्यांनी नांदेड विभागीय वहातुक अधीकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे भोकर आगाराकडून हि बससेवा लवकरच चालू केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

भोकर - माहुर हिमायतनगर मार्गे ढाणकी उमरखेड बस यापुर्वी चालु करण्यात आली होती. परंतु कोरोणा आणि कर्मचारी यांच्या संपामुळे बंद झाली होती. ती बस पूर्ववत सुरु करून प्रवाश्यांची होणारी अडचण दूर करावी अशी मागणी झाली. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत भोकर माहुर बस सुरू होणार असल्याची माहिती विभागीय वहातुक अधीकारी यांनी दिले.

या बसमुळे ग्रामीण भागातील भाविकांना दर्शनासाठी माहुरला जाण्यासाठी सोईचे होईल. त्याच प्रमाणे हिमायतनगर, ढाणकी, उमरखेड, महागाव बाजारात पेठा असल्याने व्यापारी विद्यार्थी भावीकाच्या सोईची होऊन एस टी महामंडळाच्या उत्पनात वाढ होऊन अवैद्य वाहतुकीला आळा बसेल. त्यामुळे भोकर माहुर व बिलोली माहुर बस चालु करण्यासाठी माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी यांच्या सहकार्याने शेख इरफान ढाणकी, नाथा पाटील कुर्हे ,हिरासिंग चव्हाण, बाबा खान ढाणकी, चांदराव वानखेडे पळसपुर यांनी निवेदन दिले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी